पुणे : पुण्यात जिलेबी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तीन वाहन चोरट्यांना चंदननगर पोलिसांनी (Vehicle Thief Arrested) अटक केली आहे. यावेळी त्यांच्या ताब्यातून पावणेतीन लाख रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत (Vehicle Thief Arrested).
याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. खियाराम लालाराम मेघवाल (वय 23), चुनाराम लालाराम मेघवाल (वय 21, राहणार होलपूर, तालुका बिलाडा, राजस्थान) आणि दिलखुश कुभाराम ठिंगला (वय 19, राहमार बिरावास, तालुका बिलाडा, राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
वाहन चोरीच्या अनुषंगाने तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षक गजानन जाधव, कर्मचारी तुषार भिवरकर, अमित कांबळे, सुभाष आव्हाड, परशुराम सिरसाठ आणि राहुल इंगळे परिसरात गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली होती. वाहन चोरी करणारे हे तीन चोरटे टेम्पो चौकमार्गे वडगाव शेरीकडे जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.
वाहन चोरी करणारे तीन चोरटे टेम्पो चौकमार्गे वडगाव शेरीकडे जाणार असल्याची माहिती पोलिसांना गस्ती दरम्यान मिळाली. त्यानुसार, सापळा रचून पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी चंदननगर आणि हडपसर परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली (Vehicle Thief Arrested).
हे तिघेही वडगाव शेरीत रस्त्यावर टेबल टाकून जिलेबी बनवून विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे शहरात फिरण्यासाठी दुचाकी वाहने नसल्याने वाहने चोरी करीत होते.
पोलीस अधीक्षकांच्या घराजवळच दरोडा, चोरट्यांचं थेट धुळे पोलिसांना आव्हानhttps://t.co/uYLZ86NVHr@SpDhule #Dhule #robbery
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
Vehicle Thief Arrested
संबंधित बातम्या :
Sunny Leone | सनी लिओनीच्या कार नंबरचा दुरुपयोग, मुंबईत तरुणाविरोधात गुन्हा
150 एटीएममध्ये क्लोनिंग, हजारो ग्राहकांना लुटणाऱ्या आठ जणांच्या टोळीची अखेर मुंबई पोलिसांशी गाठ
सदनिकांमध्ये वास्तव्याचा बहाण्यानं लुटमार करणाऱ्या दाम्पत्याला बेड्या, 19 ठिकाणच्या चोरीची कबुली!