Pune crime : मित्राची गर्लफ्रेंड पटवल्याचा राग, कोयत्यानं सपासप वार! पुण्याच्या वानवडी पोलिसांकडून एकाला अटक
फिर्यादी आणि त्याचा मित्र साहिल गुलाम शेख हे दुचाकीवरून पहाटे चहा पिण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपींनी या दोघांचा पाठलाग केला. त्यांनी त्यांना लुल्लानगर चौकात गाठले. साहिल शेख याने इरफान खान याच्या गर्लफ्रेंडला पटविले, असे आरोपींचे म्हणणे आहे.
पुणे : मित्राची गर्लफ्रेंड पटवल्याने कोयत्याने सपासप वार (Attack) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील गोळीबार मैदान चौक ते लुल्लानगर चौक या परिसरादरम्यान घडली शनिवारी पहाटे जवळपास साडेतीनच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल (Filed a crime) केला आहे. मित्राने एकाची गर्लफ्रेंड पटवली याचा राग मनात धरून तिघांनी तरुणावर चाकू आणि कोयत्याने सपासप वार केले आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी इरफान खान, मोसीन शेख तसेच आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे. तर नदीम सय्यद यांनी याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanawadi Police Station) फिर्याद दिली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याची कलमे या तिघांवर लावण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आरोपींनी केला पाठलाग
याविषयी माहिती देताना पोलिसांनी सांगितले, की फिर्यादी आणि त्याचा मित्र साहिल गुलाम शेख हे दुचाकीवरून पहाटे चहा पिण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपींनी या दोघांचा पाठलाग केला. त्यांनी त्यांना लुल्लानगर चौकात गाठले. साहिल शेख याने इरफान खान याच्या गर्लफ्रेंडला पटविले, असे आरोपींचे म्हणणे आहे. त्याचाच राग त्यांच्या मनात होता. यावरून त्यांनी साहिलवर चाकू आणि कोयत्याने डोक्यात तसेच खांदा, बरगडीवर सपासप वार करून गंभीर जखमी केले.
जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल
जखमी अवस्थेत साहिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पोलिसांनी याप्रकरणी इरफान इम्तियाज खान घवय 25), मोसीन सलीम शेख (वय 24, रा. मनीष पार्क, कौसरबाग, कोंढवा) यांच्यासह आणखी एकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मोसीन शेख याला अटकही केली आहे. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अशाच प्रकारची एक घटना पुण्यात नुकतीच घडली होती. एका क्षुल्लक कारणावरून तरुणावर हल्ला करण्यात आला होता. इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवले म्हणून अल्पवयीन तरुणांमध्ये वाद झाला होता. आता गर्लफ्रेंडच्या कारणावरून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.