Pune Crime : हॉलमार्कच्या आड नकली सोनं देऊन फसवायची, अखेर सराफाने अशी पकडली चोरी
सोन्याच्या दागिन्यांवरचा हॉलमार्क पाहून तिचे जुने दागिने घेऊन त्या बदल्यात सराफाने नविन दागिने दिले. हा प्रकार तीन ते चार वेळा घडला नंतर सराफाने ही आयडीया केली...
पुणे : सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्कचे चिन्ह म्हणजे सोन्याच्या शुद्धतेची खात्री, परंतू या हॉलमार्कच्या ( Hallmark Gold ) स्टॅंपवर विसंबून रहाणे पुणे ( PUNE ) येथील सराफाला ( jewellers ) चांगलेच महागात पडले आहे. एका महीलेने आपल्याकडील वापरातील हॉलमार्कचे दागिन्यांच्या बदल्यात नविन दागिना देऊन या सराफाला चांगलेच फसविले होते. तीन ते चार वेळा हा प्रकार या महीलेने निर्धास्तपणे केला पण अखेर तिला बेड्या घालण्यात पोलीसांना यश आले आहे.
हॉलमार्कचा स्टॅंप असलेला दागिने घेऊन एक 32 वर्षीय महीला पुण्याच्या एका प्रसिद्ध दागिन्यांच्या पेढीत आली होती. तिने काही जुने दागिने देऊन नविन दागिने घेतले. हॉलमार्क असल्याने सराफाने बिनधास्तपणे व्यवहार केला. ते दागिने जेव्हा मोडून वितळविण्यात आले तेव्हा ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या महीलेने अशा प्रकारे तीन ते चार वेळा फसवणूक केली. परंतू या महीलेची बनवेगिरी सराफाने वेळीच उघड केल्याने तिला अटक झाली.पुणे स्टेशन परिसरात राहणारी साक्षी सोनी नावाची महीला गेले अनेक महिने अशा प्रकारे फसवेगिरी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात गणेश पेठेतील एका सराफाने खडक पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
बोलण्यात गुंतवून पोलीसांना फोन
कस्तूर चौकातील एका सराफाकडे सोनी यांनी जुने दागिने देऊन नविन दागिने घेतले होते. तिने दिलेले सोने खोटे निघाले. तीन ते चार वेळा हा प्रकार केल्यानंतर सराफांनी याची माहीती इतर सर्व सराफांना पाठविली होती. ही महीला शनिवारी पुन्हा त्याच दुकानात आली. तिने सोन्याची चेन देऊन मंगळसूत्र खरेदी करायचे आहे असे सांगितले. सोनसाखळीवर हॉलमार्कचे चिन्हं होतं. फिर्यादीने या महीलेला ओळखून लागलीच तिला बोलण्यात गुंतवून पोलिसांना कळविले. पोलिसांनी तातडीने सराफाचे दुकान गाठून या महिलेला अटक केली. पोलिस उपनिरीक्षक जोग या प्रकरणाचा तपास करीत आहेत.