Pune Crime News : पुण्यातील येरवडा कारागृहात आणखी एका आरोपीचा मृत्यू
Crime News : पुण्यातील येरवाडा कारागृहातील आणखी एका कैद्याचा मृ्त्यू झाला आहे. त्या कैद्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होतो अशी माहिती पोलिसांनी सांगितली आहे.
पुणे : गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे खून (ramdad aakhade murder) प्रकरणीतील आरोपी बाळासाहेब खेडकरचा (criminal balasaheb khedkar) मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे. आरोपीवरती ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. येरवडा कारागृहात हा आरोपी बाळासाहेब खेडकर शिक्षा भोगत होता. १० सप्टेंबर रोजी खेडकर याला अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर येरवडा कारागृहातील (pune yerwada jail) कर्मचाऱ्यांनी त्याला ससून रुग्णालायात उपचारासाठी दाखल केला होता. आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.
बाळासाहेब खेडेकर हा मुख्य आरोपी
उरुळी कांचन येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांच्यावर १८ जुलै २०२१ रोजी रात्री दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तलवारीने वार केले होते. यामध्ये बाळासाहेब खेडेकर हा मुख्य आरोपी होता.
दोन दिवसापूर्वी त्याची प्रकृती अचानक बिघडली
उरुळी कांचन येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांच्या खून प्रकरणातील आरोपी बाळासाहेब खेडेकरसह 10 जणांवर २०२१ मध्ये मोक्का लावण्यात आला होता. तेव्हापासून तो पुण्यातील येरवडा कारागृहात होता. दोन दिवसापूर्वी त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचार त्याने प्रतिसाद न दिल्यामुळे त्या प्रकृती खालावत गेली. आज सकाळी ससून रुग्णालयात त्याचा मृ्त्यू झाला. दोन दिवसात मृत्यू झाल्यामुळे त्याचा न्यायालयीन चौकशी सुरु झाली आहे.
राज्यातील कारागृहात अधिक कैदी आहेत. तिथल्या जागेच्या क्षमतेपेक्षा कैद्यांची संख्या अधिक असल्यामुळे विविध आजार पसरत आहेत. त्याचबरोबर मनोविकाराचे अधिक आजार बळावले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात अडीच हजारापेक्षा अधिक कैदी आहेत.