केस खेचले, रस्त्यावरून ओढत-ओढत घेऊन गेला… क्रूर पतीच्या कारनाम्याने गावकरीही हादरले

हुंड्याच्या मागणीसाठी पत्नीचा क्रूरपणे छळ करणाऱ्या पतीचा कारनामा व्हिडीओत कैद झाला आहे. त्याने पत्नीचे केस ओढले, तिला रस्त्यावरून खेचतच घरी घेऊन गेला. एवढेच नव्हे तर तिला मारहाणही केली. हे सगळं रस्त्यावरचे नागरिक बघत होते, व्हिडीओही शूट करत होते, पण कोणीच शूरवीर त्याला थांबवण्यासाठी किंवा तिला वाचवण्यासाठी पुढे आला नाही.

केस खेचले, रस्त्यावरून ओढत-ओढत घेऊन गेला... क्रूर पतीच्या कारनाम्याने गावकरीही हादरले
Follow us
| Updated on: Sep 27, 2023 | 12:42 PM

चंदीगड | 27 सप्टेंबर 2023 :    देश चंद्रावर पोहोचला तरी आजही आपल्या देशात हुंड्यासाठी बायकांचा छळ केला जात असल्याचे दुर्दैवी चित्र दिसते.  हृदय पिळवटून टाकणारा असाच एक सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एका इसमाचा क्रूरपणा दिसून येत असून तो त्याच्या पत्नीशीर किती रानटी पद्धतीने वागत आहे, तेही दिसत आहे. पंजाबच्या गुरूदासपूर येथील ही घटना असून पती पत्नीचे केस ओढत, तिला रस्त्यावरून खेचत (husband dragged his wife on road) नेत असल्याचेही त्यामध्ये दिसले . एवढेच नव्हे तर त्याने तिला मारहाणही (woman beatn up) केली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला असून तो गुरूदासपूरच्या छोडिया गावातील असल्याचे समजते. पतीच्या मारहाणीला बळी पडलेल्या पीडित महिलेवर सध्या धारीवाल सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहे.

जावई नेहमी करतो मारहाण, सासूने सांगितली मुलीची दुर्दैवी कहाणी

पीडित महिलेच्या आईने याबाबत पोलिसांना माहिती दिली. माझ्या मुलीला तिचा पती नेहमीच मारहाण करतो. हुंड्यासाठी देखील तो तिचा नेहमी छळ करतो, असे त्यांनी सांगितले. याप्रकरणी आधीदेखील पोलिसांत तक्रार नोंदवली होती.

मीनू असे पीडित महिलेचे नाव असून रीटा असे तिच्या आईचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेच्या एक-दोन दिवस आधीच सासरच्यांनी मला बेदम मारहाण केली, असेही पीडितेने सांगितले. तिचा पती तर तिला सर्वांसमोर रस्त्यावरून खेचत घरी घेऊन गेला होता. ही बाब मीनूच्या माहेरच्या कुटुंबीयांना कळताच ते ग्रामपंचायत सदस्यां तेथे पोहोचले आणि तिला रुग्णालयात दाखल केले. हुंड्यासाठी सासरचे नेहमीच छळ, मारहाण करत असल्याची व्यथा पीडितेने मांडली.

मीनूचे लग्न भैनी मियाँ खानजवळील छोडियान गावात झाले होते. तिचे सासरचे नेहमी हुंड्यासाठी छळ करतात, काल तर सासरच्या लोकांनी आणि सासूनेही बेदम मारहा केली. यामुळे ती घाबरली आणि तिच्या मावशीच्या घरी निघून गेली. मात्र तिचा नवरा तिकडेही पोहोचला आणि तिच्या नातेवाईकांसमोरच तिला पुन्हा मारहाण करून, तिचे केस खेचत, रस्त्यावरून ओढत घरी घेऊन गेला.

गेल्या दिवशी तिला घरच्यांनी आणि सासूने बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर ती जवळच असलेल्या मावशीच्या घरी गेली असता तिचा नवराही तेथे आला आणि तिला मारहाण करून रस्त्यात ओढून घरी नेले.तिला बेदम मारहाण होत असल्याचे पाहून गावातील व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ बनवला. संपूर्ण गावासमोर हा रानटीपणा सुरूच होता पण त्याला थांबवण्यासाठी किंवा त्या महिलेची सुटका करण्यासाठी कोणीच पुढे आले नाहीत. मीनूचे वडील मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहेत आणि ते सगळेच गरीब कुटुंबातील असल्याने तिच्या सासरकडच्या लोकांची हुंड्याची मागणी पूर्ण करू शकत नसल्याचे तिच्या आईने सांगितले. आपल्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सध्या मीनूवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असून तिने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र अद्याप पीडित महिलेचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. तिच्या जबाबानंतरच आरोपीविरोधा कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.