पुण्यातून धक्कादायक घटना, ‘हिला आतमध्ये घ्या’, फिर्यादी महिलेला थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल
Pune Crime News : पुण्यामधून आता क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. आता तर फिर्यादी महिलेलाच पोलिसांनी थर्ड डिग्री दिल्याची खळबळजनक घटना समोलर आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तक्रार करण्यासाठी गेलेल्या फिर्यादी महिलेला पोलिसांनी थर्ड डिग्री टॉर्चर केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामध्ये पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी फिर्यादीलाच थर्ड डिग्री दिल्याने पुण्यामध्ये काय सुरू आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे ही घटना 23 मार्च 2023 मधील आहे मात्र पोलिसांवर आता गुन्हा दाखल झाला आहे. इतके दिवस कोणाचा दबाव पोलिसांवर होता? गुन्हा आताच कसा दाखल झाला असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्यामध्ये हडपसर भागात 25 वर्षीय पीडीत महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याची फिर्याद दिली. पीडितेने तिचा पती अक्षय आवटे याच्या दोन मित्रांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या ठाण्यामधील एका महिला पोलिसने फिर्यादीला बोलावून घेतलं. त्यानंतर फिर्यादी पोलीस ठाण्यात गेल्या पण तिथे गेल्यावर भलतंच घडतं.
चौकशीसाठी गेलेल्या फिर्यादीला पोलीस निरीक्षक रमेश साहेबराव साठे यांनी ‘हिला आतमध्ये घ्या’, असं सांगितलं. त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी फिर्यादी महिलेला एका खोलीत नेले. महिला पोलीस हवालदार माया गाडेकर, योगिता आफळे आणि इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी फिर्यादी महिलेला थर्ड डिग्री दिली. फिर्यादीचं काहीच कर्माचाऱ्यांना ऐकून न घेता कंबरेच्या पट्ट्याने आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. अक्षय आवटे, आदित्य गौतम आणि सुजित पुजारी ही एका राजकीय पुढाऱ्याची माणसं आहेत. तुला ते जिवंत मारतील असं तिला म्हणाले.
फिर्यादी महिलेने १३ जून गुरुवारी याबाबत फिर्याद दिली आहे. या प्रकरणात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अर्जुन सदाशिव दिवेकर (वय-50), महिला पोलीस हवालदार निलम सचिन कर्पे, माया तुकाराम गाडेकर, योगिता भानुदास आफळे, एक अनोळखी महिला पोलीस शिपाई, अनोळखी पुरूष पोलीस कर्मचारी, अक्षय जीवन आवटे (वय-31 रा. सोमवार पेठ), आदित्य गौतम (वय-30 रा. साततोटी गणेश मंडळ, कसबा पेठ), सुजित पुजारी (रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांच्यावर आयपीसी 354, 354(ब), 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.