‘त्या’ व्हायरल पत्र प्रकरणी रायगड पोलिसांची कारवाई, पुण्यातून एकाला अटक; नेमकं काय घडलं होतं?

खारघर प्रकरणात श्री सदस्यांच्या मृत्यू नंतर बनावट पत्र व्हायरल झाले होते. त्यानंतर त्या प्रकरणी रायगड पोलिसांनी पुण्यात मोठी कारवाई केली आहे.

'त्या' व्हायरल पत्र प्रकरणी रायगड पोलिसांची कारवाई, पुण्यातून एकाला अटक; नेमकं काय घडलं होतं?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 7:41 PM

रायगड : गेल्या काही दिवसांपूर्वी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला होता. खारघर येथे केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखोंच्या संख्येने श्री सदस्य उपस्थित होते. त्यामध्ये उष्माघाताने 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्याच दरम्यान डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी त्यांच्या लेटरहेडवर आपलं म्हणणे मांडलं होतं. त्यामध्ये त्यांनी श्री सदस्यांच्या मृत्यूप्रकरणी दु:ख व्यक्त केले होते. त्यानंतर त्याच पत्राचा आधार घेऊन? सोशल मिडियावर सरकारच्या विरोधात डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी कसे गेले आहेत. आणि भाजप आणि सेनेला मदत करू नका अशा आशयाचे बनावट पत्र व्हायरल झाले होते. त्यानंतर खरे की खोटे पत्र याबाबत प्रश्न उपस्थित होत होते.

त्यानंतर रायगड पोलिसांनी याबाबत दखल घेऊन गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर रायगड पोलिसांनी पुण्यात येऊन कारवाई केली आहे. हे पत्र बनवून शेयर करणाऱ्या शुभम काळे या तरुणाला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.

संशयित आरोपी असलेल्या शुभम काळे याला रायगड पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये रायगड पोलिसांनी त्याला आज अलिबाग न्यायालयात हजर केले होते. त्यानुसार त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

खरंतर संपूर्ण राज्यात हे बनावट पत्र व्हायरल झाले होते. त्यावरून उलटसुलट चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. त्यानंतर सोशल मिडियावर खरे पत्र देखील व्हायरल करण्यात आले. दोन्ही फोटो सोबत जोडून खरे आणि खोटे पत्र शेयर केले जात होते. त्याच दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान शुभम काळे हा कोणत्या पक्षाचा आहे का? त्याची काही राजकीय पार्श्वभूमी आहे का? अशा विविध अनुषंगाने पोलिस अधिकचा तपास करीत आहे. त्यामुळे रायगड पोलिसांच्या तपासात आणखी कुणाला अटक होते का? कारवाई काही राजकीय कनेक्शन समोर येते का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.