कल्याण स्टेशनवर राडा, सुट्ट्या पैशांच्या वादावरून रेल्वे स्टाफची प्रवाशाला बेदम मारहाण

पावसामुळे मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर नेहमी परिणाम होत असतो. त्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो, त्यातच लोकलच गर्दी, चेंगराचेंगरी यामुळेदेखील प्रवासी हवालदिल झालेले असतात. पण आता हे सर्व कमी की काय म्हणून प्रवाशांना चक्क रेल्वे कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्य रेल्वेवरील महत्वाचे स्थानक असलेल्या कल्याण स्टेशनवर ही खळबळजनक घटना घडली अ

कल्याण स्टेशनवर राडा, सुट्ट्या पैशांच्या वादावरून रेल्वे स्टाफची प्रवाशाला बेदम मारहाण
रेल्वे स्टाफची प्रवाशाला मारहाण Image Credit source:
Follow us
| Updated on: Aug 05, 2024 | 9:30 AM

पावसामुळे मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर नेहमी परिणाम होत असतो. त्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो, त्यातच लोकलच गर्दी, चेंगराचेंगरी यामुळेदेखील प्रवासी हवालदिल झालेले असतात. पण आता हे सर्व कमी की काय म्हणून प्रवाशांना चक्क रेल्वे कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्य रेल्वेवरील महत्वाचे स्थानक असलेल्या कल्याण स्टेशनवर ही खळबळजनक घटना घडली असून तिकीट काऊंटरवरील महिला स्टाफने चक्क एक महिलाल प्रवाशाला स्टंपने मारहाण केल्याचा अतिशय खळबळजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला असून संबंधित प्रवासी महिला जखमी झाली आहे.

सुट्ट्या पैशांच्या शुल्लक मुद्यावरून झालेल्या वादाला एवढे भयानक वळण लागेल याची कोणीही कल्पनाच केली नव्हती. यामध्ये संबंधित प्रवासी महिला जखमी झाली असून मारहाणाीमुळे तिला मोठा मानसिक धक्काही बसला आहे. य़ा खळबळजनक घटनेटा व्हि़डीओ देखील समोर आला असून स्टाफमधील ती महिला अरेरावी करत वाद घालत असल्याचेही त्यात दिसत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण असून संबंधित स्टाफवर वेळीच कारवाई करावी आणि कर्मचाऱ्यांना नीट वागण्याची सूचना द्यावी अन्यथा एकेदिवशी प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाल्यास परिस्थिती चिघळेल, असा इशारा प्रवाशांकडून देण्यात येत आहे.

नेमकं काय झालं ?

मिळालेल्या माहितीनुसार, आज ( सोमवार) सकाळी कल्याण स्टेशनवर हा प्रकार घडला. स्टेशनट्या सात नंबर प्लॅटफॉर्मवरील स्कायवॉकवर जे तिकीट काऊंटर आहे, तेथे हा वाद आणि मारामारी घडली. पीडित महिला तिकीटाच्या लाईनीत उभी होती. सुट्ट्या पैशांच्या मुद्यावरून तिचे तिकीट काऊंटरवीरल स्टाफशी भांडण झाले.

बघता बघता त्याचा वांद वाढला, त्यावेळी त्या प्रवासी महिलेने स्टाफचा व्हि़डीओ काढण्यास सुरूवात केली. त्यामुळे ती आणखीनच भडकली. आणि तिने त्या महिलेला आत ऑफीसमध्ये बोलावले आणि तिला चक्क मारहाण केली. तिला कानाखाली मारली. ते पाहून इतर प्रवाशांनी मध्यस्थी करत, आरडाओरडा करत त्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही स्टाफमधील त्या महिला कर्मचाऱ्याने मारहाण सुरूच ठेवली. यामध्ये ती महिला प्रवासी गंभीर जखमी झाली तसेच तिला मोठा मानसिक धक्काही बसला.

प्रवासी आक्रमक

अखेर इतर प्रवाशांनी स्टाफच्या हातातून कशीबशी त्या महिलेची सुटका केली. तेवढ्यात तेथे रेल्वे पोलिस अधिकारी आले आणि त्यांनी प्रकरण समजून घेत मध्यस्थी केली. तब्बल अर्ध्या तासाच्या गोंधळानंतर रेल्वे पोलिसांच्या मदतीने प्रवासी व तिकीट काउंटरवरील स्टाफचा वाद मिटला. मात्र प्रवाशांना नेहमीच रेल्वे स्टाफकडून अशी वाईट वागणूक मिळते, असा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. रेल्वे स्टाफला वेळीच समज द्यावी अन्यथा एखाद दिवस प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट होईल आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊन चिघळेल असा इशारा उद्विग्न प्रवाशांनी दिला.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.