‘..तर राज कुंद्रांना 3 वर्षांसाठी जेलमध्ये जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही’
राज कुंद्रांविरोधात आयपीसी कलमांसोबतच आयटी अॅक्ट कलम 67, 67A लावले गेले आहेत. त्यातील 67A हे पोर्नोग्राफी संदर्भात आहे. तो अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यात पहिल्यांना गुन्हा केला असेल तर 3 वर्षाची शिक्षा आणि 5 लाख रुपये दंड आकारला जातो.
मुंबई : अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या हाती राज कुंद्रा यांच्या विरोधात भक्कम पुरावे लागले आहेत. मंगळवारी क्राईम ब्रांचची टीम त्यांना भायखळा तुरुंगात नेत असताना, ते निराश दिसत होते. या दरम्यान राज कुंद्रा यांनी प्रश्नांची उत्तरेदेखील दिली नाहीत. मुंबई पोलीस अनेकवेळा भायखळा येथे आरोपींना ठेवतात आणि येथूनच त्यांची चौकशी केली जाते. दरम्यान, या प्रकरणात राज कुंद्रा यांना 3 वर्षांसाठी तुरुंगात जाण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असा अंदाज कायदे तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. (According to legal experts, Raj Kundra has been sentenced to at least 3 years in prison)
राज कुंद्रा यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या हाती भक्कम पुरावे आहेत. त्यांच्याविरोधात अनेक आयपीसी कलमांसोबतच आयटी अॅक्ट कलम 67, 67A लावले गेले आहेत. त्यातील 67A हे पोर्नोग्राफी संदर्भात आहे. तो अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यात पहिल्यांना गुन्हा केला असेल तर 3 वर्षाची शिक्षा आणि 5 लाख रुपये दंड आकारला जातो. एकाच व्यक्तीने दुसऱ्या वेळीही तोच गुन्हा केल्यानंतर तर त्याला 5 वर्षाची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड आहे. तर तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास 7 वर्षाची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंडाची तरदूत असल्याची माहिती कायदे विशेषज्ञ आणि सायबर एक्सपर्ट प्रशांत माळी यांनी दिलीय.
राज कुंद्राचा शर्लिन चोप्राबरोबर करार
हाराष्ट्र सायबरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांची नावे आरोपी म्हणून आली आहेत. त्यांचा जबाब महाराष्ट्र सायबरने नोंदवला आहे. या दोन्ही अभिनेत्रींनी कुंद्रावर आरोप केले होते. राज कुंद्रा यांना गेल्या वर्षी कोर्टाकडून अंतरिम जामीन मिळाला होता आणि जामीन अर्जावर अंतिम सुनावणी या महिन्याच्या शेवटी होणार होती.
युट्यूबर पुनीत कौरचे राज कुंद्रावर गंभीर आरोप
राज कुंद्राविषयी (Raj Kundra) युट्यूबर पुनीत कौरने (Puneet Kaur) एक धक्कादायक खुलासा केला आहे. पुनीत कौरचा आरोप आहे की, राज कुंद्राने तिला त्याच्या या मोबाइल अॅप हॉटशॉट्सशी कनेक्ट करता यावे यासाठी थेट संदेश पाठवला होता. तथापि, पूर्वी तिला हा स्पॅम मेसेज असल्याचे वाटले होते.
पुनीत कौरने तिच्या आरोपांवर राज कुंद्रावर तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केला आहे. पुनीतने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही बातम्या शेअर केल्या आहेत, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे- “ब्रो, तुला आठवतो का आपला डायरेक्ट मेसेज?, जेथे त्याने मला हॉटशॉट्ससाठी मेसेज केला होता?’ हे कॅप्शन पुनीतने एका मित्राला टॅग करुन लिहिले होते.
संबंधित बातम्या :
‘त्याला उगाच बदनाम करण्याचा प्रयत्न करु नका’, राज कुंद्राच्या समर्थनार्थ पुढे आली राखी सावंत
According to legal experts, Raj Kundra has been sentenced to at least 3 years in prison