राजस्थानच्या अलवार (Alwar, Rajsthan Crime News) जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर गँगरेप (Gang rape case) करण्यात आला. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलीवर आठ जणांनी मिळून संतापजनक कृत्य केलं. या मुलीचा नराधमांनी अश्लिल व्हिडीओही बनवला होता. त्यानंतर त्यांनी या मुलीला व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) टाकायची धमकी दिली आणि तिच्याकडून 50 हजार रुपयेही उकळले. विकृती तर याही पुढे होती.
गँगरेप करणाऱ्यांनी 50 हजार रुपये घेतल्यानंतरही पीडितेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केलाच. धक्कादायक बाब हा व्हिडीओ पीडितेच्या घरातल्यांपर्यंत पोहोचला आणि तेही हादरले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.
पीडितेच्या नातलगांनी अखेर पोलीस स्थानक गाठलं. तिच्या वडिलांनी आणि भावाने आठ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. पॉक्सो कायद्यातंर्गत आणि आयटी कायद्याच्या खाली आता पोलिसांनी याप्रकरणी आठ नराधमांविरोधात गुन्हा नोंदवून घेतला आहे. मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
पीडितेनं दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, 9 महिन्यांआधी तिच्यावर गँगरेप करण्यात आला होता. 8 युवकांनी मिळून आपल्यासोबत घृणास्पद कृत्य केलं होतं. त्यांनी आधी माझे अश्लिल फोटो काढले. नंतर ते फोटो देण्याच्या बहाण्याने मला बोलावलं आणि माझ्यावर जबरदस्ती केली, असं पीडितेनं म्हटलंय.
यानंतर जबरदस्ती कपडे उतरवायला लावले आणि माझा एक व्हिडीओ बनवला, असाही आरोप करण्यात आलाय. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीसोबत नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केला. पण यानंतरही नराधम थांबले नाही.
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी नराधमांनी पीडितेला दिली. व्हिडीओ जर व्हायरल होऊ द्यायचा नसेल, तर आम्हाला दीड लाख रुपये दे, असं सांगून तिला ब्लॅकमेल केलं. सुरुवातीला पीडितेने 50 हजार रुपये कुठूनतरी जमवून दिले. पण एक लाख रुपये जमवणं तिला जमलं नाही.
पैशांच्या लालसेनं बधिर झालेल्या नराधमांनी अखेर या मुलीला काढलेला अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केला. तो नंतर पीडितेच्या घरातल्यांपर्यंत पोहोचला. त्यानंतर मुलीला कुटुंबीयांकडून विचारणा करण्यात आली. तेव्हा हे सगळं प्रकरण उघडकीस आलं.
31 डिसेंबर 2021 रोजी रफीक नावाच्या संशयित आरोपीने फोन करुन पीडितेला एका ठिकाणी बोलावलं. पण तिने येण्याच नकार दिला. तेव्हा रफीकने पीडितेला फोटो सोशल मीडियात अपलोड करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर घाबरुन पीडिता रफीकला भेटायला गेली. पण तिथे तिच्यासोबत नराधमांनी संतापजनक कृत्य केलं.
पोलिसांनी आता सर्व आरोपींची नावं पीडितेकडून घेतली आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथकंही तैनात केली. पण सर्व आरोपी सध्या फरार आहेत. त्यांचा कसून शोध घेतला जातोय. लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं. राजस्थानात घडलेल्या या घटनेनं सगळेच हादरुन गेलेत.