जवानाचा अपघाती मृत्यू, अनुकंपाच्या नोकरीवरून दोन्ही पत्नींच्या वादात दीर गेला तुरूंगात… रात्री नेमकं काय घडलं?

Crime News : विश्वासाचा गैरफायदा घेत फसवणूक करत असल्याची अनेक प्रकरण आपण पाहिली आहेत. सध्या अशा अनेक घटना समोर येत असून त्यातूनच गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. अशातच एक घटना समोर आली आहे.

जवानाचा अपघाती मृत्यू, अनुकंपाच्या नोकरीवरून दोन्ही पत्नींच्या वादात दीर गेला तुरूंगात... रात्री नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 11:10 PM

नवी दिल्ली : आताच्या कलियुगामध्ये आपले जवळचेच लोक विश्वासाचा गैरफायदा घेत फसवणूक करत असल्याची अनेक प्रकरण आपण पाहिली आहेत. सध्या अशा अनेक घटना समोर येत असून त्यातूनच गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. अशातच एक घटना समोर आली आहे.

ही धक्कादायक घटना राजस्थानमधील भरतपुर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी सुधा चौधरी नावाची 32 वर्षीय महिला तिच्या मुलासोबत स्कूटीवरून जात होती. त्यावेळी या महिलेला दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून तिची केली होती. या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला होता. आता या धक्कादायक घटनेचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

या हत्याप्रकरणातील आरोपी पोलिसांनी शोधून काढले आहेत. या महिलेची हत्या करणारा मास्टरमाईंड दुसरा तिसरा कोण नसून तिचा सख्खा दीर आहे. मृत महिलेचा आरोपी दिर मनोज सिंह याला बुधवारी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यानेच हत्येचा कट रचल्याचं पोलिसांना सांगितलं.

मृत सुधा चौधरी यांचे पती पुष्पेंद्र सिंह हे सीआरपीएफमध्ये होते. त्यांनी उत्तर प्रदेशातील सुशीला देवी या महिलेशी दुसरं लग्न केलं होतं. त्यामुळे सुधा चौधरी या त्यांच्या सासरी न राहता त्या त्यांच्या आईकडे राहत होत्या. नंतर पुष्पेंद्र सिंह यांचा 27 जुलै 2022 रोजी एका अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर दोन्ही पत्नी सुधा चौधरी आणि सुशीला देवी यांच्यात अनुकंपा नोकरीवरून वाद झाले होते.

पतीच्या निधनानंतर मिळणाऱ्या लाभासाठी दोन्ही पत्नींमध्ये भांडण झालं होतं. तसेच यामध्ये आरोपी मनोज सिंहने त्याच्या भावाच्या दुसर्‍या पत्नीला म्हणजेच सुशीला देवीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्याने हत्येचा कट रचत सुधा चौधरी यांची हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी मनोजला अटक केली असून बाकीच्या आरोपींचा शोध सुरू आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.