नवरा-बायकोचं एकत्र मद्यपान, नंतर मद्यधुंद पत्नीकडून पतीची हत्या

आपला मुलगा अनिल कुमार यांची सून मंजूने हत्या केल्याची तक्रार कुंती यांनी दिली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

नवरा-बायकोचं एकत्र मद्यपान, नंतर मद्यधुंद पत्नीकडून पतीची हत्या
राजस्थानमध्ये पत्नीकडून पतीची हत्याImage Credit source: फेसबुक
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 3:00 PM

जयपूर : राजस्थानमधील बाडमेर (Rajasthan Crime News) जिल्ह्यात मद्यधुंद पत्नीने पतीची हत्या (Husband Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित दाम्प्त्याने आधी एकत्र मद्यपान केलं. त्यानंतर दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाले. त्या वादाचं पर्यवसन हत्येत झाल्याची माहिती आहे. बाडमेरमधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. मद्याच्या अंमलाखाली असलेल्या पत्नीने (Drunk Wife) पतीचा गळा आवळला, त्यानंतर पतीचा जागीच मृत्यू झाल्याचा आरोप आहे. मयत तरुणाच्या आईने आपल्या सुनेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पत्नीला ताब्यात घेतलं. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली.

काय आहे प्रकरण?

आपला मुलगा अनिल कुमार यांची सून मंजूने हत्या केल्याची तक्रार कुंती यांनी दिली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

दोघांनाही दारु पिण्याचे व्यसन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती-पत्नी दोघांनाही दारु पिण्याचे व्यसन आहे. मंगळवारी रात्रीही दोघं मद्यधुंद अवस्थेत होते. यावेळी दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. त्यानंतर मंजूने पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या. तो गाढ झोपेत असताना तिने बेल्टने त्याचा गळा दाबल्याची माहिती आहे. यावेळी अनिल जागीच गतप्राण झाला.

अनिलच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत मंजूची चौकशी केली. यावेळी तिने हत्येची कबुली दिली. पोलिसांनी आधी तिला ताब्यात घेतले. अनिलचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.

संबंधित बातम्या :

सीआरपीएफ जवानाची बायको, मेकॅनिकवर जीव जडला, अनैतिक संबंधातून जीव गमावला

मुलगा कुलूप उघडून घरात, आई मृतावस्थेत, जळगावातील हत्येचं गूढ काही तासात उलगडलं

बाबांनी विवाह ठरवला, तरुणीचा प्रियकरामागे लग्नासाठी तगादा, संतापलेल्या बॉयफ्रेण्डचं टोकाचं पाऊल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.