Rajasthan | घरच्यांचा लग्नाला विरोध, प्रेमी युगुल नदीवरील रेल्वे पुलावर, हायव्होल्टेज ड्राम्याने मालगाडीचा खोळंबा

कल्याणपुरा गावातील रहिवासी असलेला करण आणि नीमच रोड येथे राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी हे दोघे गेल्या दीड वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. दोघांनाही लग्न करायचे होते, पण घरच्यांनी नकार दिला.

Rajasthan | घरच्यांचा लग्नाला विरोध, प्रेमी युगुल नदीवरील रेल्वे पुलावर, हायव्होल्टेज ड्राम्याने मालगाडीचा खोळंबा
स्वतःच्या शेतीवर राखणदारीला गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळलाImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 1:30 PM

जयपूर : राजस्थानच्या (Rajasthan) चित्तोडगडमधील (Chittorgarh) निंबाहेडा येथे रविवारी प्रियकर-प्रेयसीचा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. नदीवरील रेल्वे पुलावरुन उडी मारुन आत्महत्या करण्यासाठी (Suicide Attempt) एक प्रेमी युगुल दाखल झालं होतं. मात्र आत्महत्या करण्यापूर्वीच तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी या जोडप्याला वाचवलं. दोघांच्याही कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिला होता. त्यामुळे निराश झालेले प्रियकर-प्रेयसी रेल्वे रुळावर जीव देण्यासाठी उभे राहिले होते. सुमारे दीड तास चाललेल्या या नाट्यामुळे एक मालगाडी थांबून राहिली.

काय आहे प्रकरण?

कल्याणपुरा गावातील रहिवासी असलेला करण आणि नीमच रोड येथे राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी हे दोघे गेल्या दीड वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. दोघांनाही लग्न करायचे होते, पण घरच्यांनी नकार दिला. याचा राग येऊन दोघेही रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास कदममाळी नदीवरील रेल्वे पुलावर गेले.

तिथून ते नदीत उडी मारणार होते. यावेळी काही ओळखीच्या लोकांनी दोघांना पाहिले. त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांना सांगितलं. कुटुंबीयांनी फोन केला असता मुलीने आत्महत्या करत असल्याचं सांगितलं.

लग्नाला होकार दिल्यास दोघंही आपला निर्णय बदलू, असंही तिने कुटुंबीयांना सांगितले. याच वेळी कोणीतरी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. काही वेळातच तिथे गर्दी जमा झाली.

पोलिसांनी दोघांना रेल्वे ट्रॅकवरुन हटवलं

दोघांना वाचवण्यासाठी गावातील काही जणांनी नदीत उड्या मारल्या होत्या. काही तरुण घटनास्थळी पोहोचले आणि दोघांनाही रुळावरुन हटवले. करण आणि अल्पवयीन मुलगी पोलिसांना वारंवार धमकावत होते, की जवळ आल्यास दोघेही नदीत उड्या मारतील. त्यांना ट्रॅकवरुन हटवल्यानंतर कोतवाली पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात आणले आणि शांतता भंग केल्याप्रकरणी करणला अटक केली. अल्पवयीन मुलीला बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले. सुमारे दीड तासानंतर दोघांना रुळावरून हटवल्यानंतर मालगाडी रवाना होऊ शकली.

दीड वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये

करण निंबाहेडा येथील शाळेत शिकतो. तर मुलगी जवळपासच्या एका शाळेत जाते. शाळेत जात असताना मुलीची करणशी भेट झाली होती. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. तीन-चार महिन्यांपूर्वी दोघेही सोबत पळून गेले होते. पोलिसांनी त्यांना पकडून आणले. तेव्हापासून दोन्ही कुटुंबीय दोन्ही मुलांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. दोघांचे समाज वेगवेगळे असल्यामुळे कुटुंबीय लग्नाला राजी होत नसल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

टिटवाळ्यावरुन वाशीला जीव द्यायला आला! नोकरी नसल्यानं पुलावरुन उडीही टाकली आणि…

दोघींसोबत रिलेशनशीपमध्ये, वादावादीतून एकीची समुद्रात उडी, गर्लफ्रेण्डला वाचवताना तरुणाचा बुडून मृत्यू

शेतात नेऊन बायको-मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न, वाचलेल्या लेकराने मामाला फोन केला आणि…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.