अवघ्या 8 महिन्यांचा कोवळा जीव कुत्र्याने जबड्यात पकडला आणि अनर्थ!

नेमकी कुठे घडली ही थरकाप उडवणारी धक्कादायक घटना? जाणून घ्या सविस्तर

अवघ्या 8 महिन्यांचा कोवळा जीव कुत्र्याने जबड्यात पकडला आणि अनर्थ!
Dog AttackImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 2:51 PM

राजस्थान : जयपूरमध्ये सरकारी रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे एक धक्कादायक घटना घडली. रविवारी संध्याकाळी सांगानेरी येथे असलेल्या महिला रुग्णालयाच्या गेट नंबर एक जवळ कुत्रा दिसून आला. या कुत्र्यानं आपल्या जबड्यात 8 महिन्यांच्या बाळाला पकडलेलं होतं. हे दृश्य पाहून रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली होती. लोकांनी या कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण यानंतर सुरु झालेली झटापट आणखीनच थराकाप उडवणारी होती.

ही घटना निदर्शनास आल्यानंतर लोक कुत्र्याच्या तोंडातून कोवळा जीव सोडण्यासाठी आटापीटा करु लागले. पण कुत्र्यानं आपल्या जबड्यात त्या कोवळ्या जीवाला घट्ट पकडून रुग्णालयाच्या आवारात लागलेल्या ऑक्सिजन प्लांटजवळील भींतीवर जाऊन बसला. या घटनेची माहिती नंतर पोलिसांनी देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी धाव घेत या संपूर्ण प्रकाराचा तपास करण्यात सुरुवात केली असून एक रिपोर्टही सादर करण्यात आलाय.

रविवारी दुपारी नेहमीप्रमाणे रुग्णालयाचा दिवस होता. पण एक कुत्रा पार्किंग परिसरात विचित्र हालचाली करताना दिसला. या कुत्र्याच्या तोंडात मांस तुकडा असल्यासारखा एक तुकडा लटकलेला असल्यासारखं तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांना भासलं. इथूनच खरा संशय सुरु झाला.

रुग्णालय प्रशासनाने प्रयत्नांची शर्थ करत अखेर कुत्र्याने तोंडात पकडलेला तो कोवळा जीव सोडवला खरा. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. उत्तरीय तपासणी त्या 8 वर्षांच्या चिमुरड्या बाळाचा मृत्यू झाला होता. आता त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणीदेखील केली जाणार असल्याचं समोर आलंय.

रुग्णालयात सोमवारी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाच्या वतीनेही पुढील तपास केला जातोय. नवजात बाळाचा कुत्रा रुग्णालयातून तोंडात पकडून बाहेर पळून आला होता आणि त्यानंतर त्या बाळासोबत तो कुत्रा पार्किंगच्या परिसरात भटकत होता, असं महिला चिकित्सालय अधीक्षक आशा वर्मा यांनी म्हटलंय.

या घटनेची आता उच्चस्तरीय चौकशी केली जावी, अशी मागणी केली जाते आहे. रुग्णालयातील प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळेच ही घटना घडली असावी, अशी शंका घेतली जातेय. आता पोलीसही याप्रकरणी पुढील तपास करत असून नेमकी काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.