Jaipur Crime | आर्मी ऑफिसर असल्याचा बनाव, 50 हून अधिक तरुणींशी संबंध, बलात्कारानंतर निर्घृण हत्या

आरोपी मिंटू हा ओळख बदलून भिवाडी येथे राहत होता. एक गुन्हा केल्यानंतर तो दुसऱ्या शहरात जायचा. कुठे आयकर अधिकारी, कुठे आर्मी ऑफिसर म्हणून, तर कुठे पोलीस म्हणून तो राहत असे

Jaipur Crime | आर्मी ऑफिसर असल्याचा बनाव, 50 हून अधिक तरुणींशी संबंध, बलात्कारानंतर निर्घृण हत्या
आरोपी मिंटूला अटक
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 10:23 AM

जयपूर : जयपूरमधील कर्धनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यांपूर्वी झालेल्या तरुणीच्या हत्या प्रकरणी (Jaipur Murder Case) पोलिसांनी भिवाडी येथून नराधमाला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून धक्कादायक खुलासे झाले आहेत. संबंधित तरुणीची हत्या तिचा प्रियकर मिंटू (Mintu) उर्फ ​​विक्रम याने केली होती. मिंटूने यापूर्वीही आपल्या एका प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह ग्वाल्हेरमधील (Gwalior) रेल्वे रुळांवर फेकून दिला होता. याशिवाय अल्वरमध्येही एका अल्पवयीन मुलीने त्याच्याविरोधात बलात्काराचा आरोप केला आहे. आरोपी हा सेक्स अॅडिक्ट असून त्याचे आतापर्यंत 50 हून अधिक मुलींसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी मिंटू हा ओळख बदलून भिवाडी येथे राहत होता. एक गुन्हा केल्यानंतर तो दुसऱ्या शहरात जायचा. कुठे आयकर अधिकारी, कुठे आर्मी ऑफिसर म्हणून, तर कुठे पोलीस म्हणून तो राहत असे. ग्वाल्हेरमधील तक्रारदार मुलगीही तिच्या बहिणीच्या घरी आली होती, तेव्हा मिंटूने तिला पळवून नेले. लग्नाचा आग्रह धरुन मिंटूने ग्वाल्हेर आणि जयपूर येथील तरुणींची हत्या केली.

कधी पोलीस, तर कधी आर्मी ऑफिसर

मिंटूने अनके तरुणींची फसवणूक केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्याची कसून चौकशी केली जात आहे. आरोपी मिंटू हा ‘सायको’ असल्याचं पोलीस म्हणतात. त्यामुळे प्रकरणात मानसोपचार तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येत आहे. भिवाडीमध्येही नाव बदलून तो पोलिस असल्याचं भासवून राहत होता.

देह व्यापार सोडण्याचा तगादा

मिंटू आणि रोशनी जयपूरमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, असे सांगण्यात येते. एका हॉटेलमध्ये तिची मिंटूशी भेट झाली. या भेटीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही काही काळासाठी उत्तर प्रदेशातील हरदोई येथे गेले. मात्र त्यानंतर मिंटू आणि रोशनी राजस्थानला परत आले आणि कर्धनी येथील आर्मी नगरमध्ये राहू लागले. मिंटू रोशनीला वेश्या व्यवसाय करु नये, रात्रीची नोकरी करु नये, असे समजावत असे. मात्र रोशनीने वेश्या व्यवसायाचे काम सोडले नाही, तेव्हा मिंटूने तिची उशीने गळा आवळून हत्या केली आणि नंतर येथून पळ काढला. 23 फेब्रुवारी रोजी आर्मी नगरमध्ये रोशनीची हत्या करण्यात आली होती.

दरम्यान, आरोपीने शेजाऱ्याला फोन करून रोशनीशी बोलण्याचा बहाणाही केला. दोन महिन्यांपासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. आरोपी अल्वरच्या भिवाडी येथे असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिस तपासात समोर आले आहे की, आरोपी स्वत:ला आर्मी ऑफिसर आणि इन्कम टॅक्स ऑफिसर असल्याचं सांगायचा. आरोपीने इन्कम टॅक्स ऑफिसर आणि आर्मीच्या ड्रेसमध्ये फोटोही काढले आहेत. यावरुन तो लोकांवर रुबाब झाडत असे.

50 हून अधिक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले

अल्वर येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी मिंटू गेल्या तीन वर्षांपासून फरार होता. ग्वाल्हेरमध्येही आरोपीने आपल्या एका साथीदारासह एका मुलीची हत्या करून तिचा मृतदेह फेकून दिला होता. तपासादरम्यान आरोपीने आतापर्यंत 50 हून अधिक मुलींना आपल्या प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवल्याचे समोर आले आहे. आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

संबंधित बातम्या :

वर्ध्यात चारित्र्याच्या संशयातून दगडाने ठेचून पत्नीची हत्या, आरोपी पतीला अटक

संजय बियाणींच्या हत्येचा कट परभणीत? कुटुंबीयांना आलेल्या निनावी पत्राने खळबळ

नातेवाईकाच्या लग्नात किरकोळ कारणावरुन वाद, नांदेडमध्ये मित्राकडून तरुणाची हत्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.