नियतीने सूड उगवलाच… पत्नीला नग्न करून धिंड काढली, पोलिसांच्या तावडीतून पळतानाच…. नराधम नवऱ्याचं काय झालं ?

विवाहीत महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर तिच्या पतीने तिला पकडून आणले आणि तिला नग्न करून तिची धिंड काढली. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल करण्यात आला, त्यामुळे संपूर्ण देश हादरला. अखेर त्या नराधम पतीला पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे.

नियतीने सूड उगवलाच... पत्नीला नग्न करून धिंड काढली, पोलिसांच्या तावडीतून पळतानाच.... नराधम नवऱ्याचं काय झालं ?
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 3:18 PM

मुंबई | 2 सप्टेंबर 2023 : गर्भवती महिलेला नग्न करून तिला मारहाण करत तिची गावभर धिंड काढल्याप्रकरणी (paraded in village) पोलिसांनी 10 जणांची नावे जाहीर केली आहेत. त्यापैकी मुख्य आरोपीसह 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या धरपकडीदरम्यान मुख्य आरोपी कान्हा याच्यासह आणखी दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर आरोपींचा अद्याप शोध सुरू असल्याचे पोलिसांनी नमूद केले. पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मुख्य आरोपीचा पाय मोडला आहे. तो पीडितेचा नवरा आहे.

पीडित महिलेने तिचा पती आणि त्याचे सहकारी सूरज, वेनिया, नेतिया, नाथू, महेंद्र यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींनी तिला बाईकवर बसवून घेऊन गेले आणि नंतर तिला निर्वस्त्र करून धिंड काढण्यात आली , असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. अखेर याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी, पीडितेचा नवरा, तसेच इतरांसह एका अल्पवयीन मुलाला देखील अटक केली.

व्हिडीओ समोर आल्यावर माजला होता गदारोळ

प्रतापगड जिल्ह्यातील एका गावात २१ वर्षीय महिलेला विवस्त्र केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेथे गरोदर महिलेला नग्न करून गावभर फिरवण्यात आले. त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये दुर्दैवी महिला, रडत विव्हळत असल्याचे दिसत होते. या महिलेचा पती आणि कुटुंबीयांनीच तिला विवस्त्र करून मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर एकच गदारोल माजला होता. अखेर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले कडक कारवाईचे आदेश

या प्रकरणी कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिले. दोषींवर जलदगती न्यायालयात खटला चालवला जाईल, असे ते म्हणाले.

नक्की काय झालं ?

हा घृणास्पद प्रकार प्रतापगड जिल्ह्यातील धारियावाड शहरातील पहाडा गावात घडला. पीडत महिलेचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. मात्र तिचे दुसऱ्या तरूणावर प्रेम होते. चार-पाच दिवसांपूर्वी पीडित महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. मात्र तिच्या घरच्यांना हे कळताच त्यांनी तिचा पाठलाग करून तिला पकडले आणि गावी आणले. नंतर तिला निर्वस्त्र करून गावभर धिंड काढण्यात आली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.