The Kerala Story चित्रपटाबद्दल चांगलं बोलण्याची विश्व हिंदू परिषदेच्या सदस्याला चुकवावी लागली मोठी किंमत

| Updated on: May 08, 2023 | 2:30 PM

The Kerala Story : "व्हॉट्सअप स्टेटसवर चित्रपटात कौतुक करुन, तू आमच्या समाजाचा अपमान केला, असं ते तिघे बोलल्याच पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितलं"

The Kerala Story चित्रपटाबद्दल चांगलं बोलण्याची विश्व हिंदू परिषदेच्या सदस्याला चुकवावी लागली मोठी किंमत
the kerala story
Follow us on

जयपूर : सध्या सर्वत्र ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाबद्दल चांगलं मत व्यक्त करणं एका माणसाला चांगलच महाग पडलय. या माणसाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘द केरळ स्टोरी’ बद्दल सकारात्मक मत व्यक्त केलं होतं. या माणसाने त्याच्या व्हॉट्स अप स्टोरीमध्ये तरुण महिलांना ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट पाहण्याची विनंती केली होती. म्हणून या माणसाला बेदम मारहाण करण्य़ात आली. त्याला धमकावण्यात आलं.

राजस्थानमध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. ज्याला, मारहाण झाली तो विश्व हिंदू परिषदेचा सदस्य आहे. मंदिर पोलीस ठाण्यात त्याने तक्रार नोंदवली आहे. तिघांविरोधात त्याने FIR नोंदवलाय.

‘तू आमच्या समाजाचा अपमान केला’

“पीडीत व्यक्ती शनिवारी रात्री आपल्या घरी येत होता. त्यावेळी तिघांनी त्याला वाटेत अडवलं. व्हॉट्सअप स्टेटसवर चित्रपटाच कौतुक करुन, तू आमच्या समाजाचा अपमान केला, असं ते तिघे बोलल्याच पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितलं” सहाय्यक पोलीस आयुक्त देरावर सिंह यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे.

चित्रपटात काय दाखवलय?

मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘द केरळ स्टोरी’चा टीझर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. 30 हजारपेक्षा जास्त महिलांच इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आल्याचा चित्रपट निर्मात्यांचा दावा आहे.

शुक्रवारी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झालाय. त्यावरु विविध वाद, प्रतिक्रिया उमटत आहेत. मुलींच इस्लाममध्ये धर्मांतर झाल्यानंतर त्यांना अफगाणिस्तान, येमेन आणि सिरिया या देशांमध्ये पाठवण्यात येतं, असा द केरळ स्टोरीचा दावा आहे.