लग्नासाठी प्रेयसीसाठी दबाव टाकला, नकार मिळाल्यावर जंगलात बोलावून थेट..
लग्न कर असं सांगत एक तरूण त्याच्या प्रेयसीवर दबाव टाकत होता, मात्र तिने लग्न करण्यास नकार दिला होता. यामुळे तो संपातला आणि त्याने तिला जंगलात बोलावले आणि थेट.. त्याच्या या कृत्याने सगळेच हादरले.
जयपूर | 19 सप्टेंबर 2023 : प्रेमात लोकं आधळी होतातं, अस म्हणतात. पण काही वेळा प्रेमात लोकांची शुद्धही हरवते, कारण त्यांच्यावर प्रेमाचं (in love) भूत एवढं स्वार असतं की योग्य अयोग्य काय, याची त्यांना जाणीवरही होत नाही. आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यानेही आपल्यावरच प्रेम केलं पाहिजे. नाहीतर टोकाचं पाऊल उचलायलादेखील काही लोकं मागे पुढे पहात नाहीत. अशीच एक प्रेमवीराची धक्कादायक कहाणी समोर आली असून त्याने त्याचं प्रेम मिळत नाही म्हणून धक्कादायक पाऊल उचललं.
राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील ही घटना आहे. तेथे एक मुलगी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. मात्र तिचा मृतदेह आता सापडला असून पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. तिच्याच प्रियकराने तिची गळा दाबून हत्या केली आणि नंतर त्या हत्येला आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न त्याने केला. आरोपी युवक हा मृत तरूणीवर लग्नासाठी दबाव टाकत होता. पण ती तरूणी मात्र लग्नासाठी तयार नव्हती. याच रागातून त्याने तिला जंगलात बोलावले आणि गळा दाबून तिची हत्या केली. पोस्टमॉर्टम केल्यानंतर पोलिसांनी तरूणीचा मृतदेह तिच्या कुटुंबियांकडे सोपवला. आपल्याच प्रेयसीचा खून करणाऱ्या त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबर रोजी धामोतर पोलीस ठाण्यात एक मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. पोलीस त्या मुलीचा शोध घेत असतानाच 16 सप्टेंबर रोजी देवगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवाक माता जंगलात एका मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. बेपत्ता झालेली मुलगीच मृत झाल्याचे तपासात स्पष्ट झाले.
पहिले जंगलात बोलावले अन् नंतर थेट गळाच दाबला
याप्रकरणी तरुणीच्या कुटुंबीयांनी कमलेश टेलर नावाच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तांत्रिक आधारावर तपास सुरू केला. आरोपी तरुण कमलेश हा तरुणीवर लग्न करण्यासाठी खूप दबाव टाकत होता, मात्र ती लग्नासाठी तयार नव्हती अशी माहिती तपासातून समोर आली. यामुळे संतापलेल्या कमलेशने त्या तरूणीला दिवाक मातेच्या जंगलात बोलावले. तेथेही त्यांचा बराच वाद झाला. अखेरच रागाच्या भरात कमलेशने गळा दाबून खून केला. मात्र भानावर आपण काय करून बसलो, हे त्याच्या लक्षात आल्याने त्याने तिच्या हत्येला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला.
14 सप्टेंबरला झाली होती बेपत्ता
खरतर ही तरूणी 14 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाली होती. ती शेवटची कमलेशसोबतच गावात दिसली होती. ती बेपत्ता झाल्यापासून कमलेशही कुठेच दिसत नव्हता, त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता. तीन दिवसांनी मुलीचा मृतदेह जंगलात सापडल्यानंतर कुटुंबीयांनी कमलेश टेलरविरुद्ध गुन्हा दाखल केला. अहवाल नोंदवल्यानंतर पोलिसांनी सायबर टीमच्या मदतीने तत्परता दाखवत अवघ्या 6 ते 7 तासांत आरोपीला अटक केली.