तिला गिफ्ट दिलं नसतं तर आज तो वाचला असता… काय घडलं त्यांच्यामध्ये ?
आपल्याच क्लासमधील एका विद्यार्थिनीचा मानलेला भाऊ बनणं एका विद्यार्थ्याला खूपच महागात पडलं. त्याने रक्षाबंधनाच्या निमित्ताने तिला गिफ्ट दिलं खरं पण ते पाहून...
जयपूर| 18 सप्टेंबर 2023 : आपल्याच क्लासमधील एका मैत्रीणीचा मानलेला भाऊ बनणे एका तरूणाला फारच महागात पडले. त्या मुलीच्या भावाला हे सहन झालं नाही आणि त्याने थेट त्याचा जीवच(crime news) घेतला. राजस्थानमधील बारन जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. खुनाच्या या गुन्ह्यामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. तर तरूण मुलाचा एवढ्याशा कारणावरून जीव गेल्याने त्याच्या कुटुंबियांचा दु:खाला पारावार उरला नाही. पोलिसांनी मृतदेहाचे पोस्टमॉ र्टम करून तो कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र तरुणाच्या मृत्यूनंतर (murder) संतप्त कुटुंबीयांनी पोलीस प्रशासनाविरोधात निदर्शने केली.
पोलिसांच्या सांगण्यानुसार, हत्येची ही घटना बारन जिल्ह्यातील अंता पोलीस स्टेशन परिसरात घडली. हरीश सुमन असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो दहावीत शिकत होता. त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याच्चया वर्गात शिकणाऱ्या एका मुस्लिम मुलीने रक्षाबंधनाच्या दिवशी हरीशला राखी बांधली होती. त्याबदल्यात हरीशने मुलीला गिफ्टही दिले. मात्र त्या मुलीच्या भावाचा गैरसमज झाला.
रुग्णालयात सुरू होते उपचार
त्यानंतर रक्षाबंधनाला सुमारे २ आठवडे उलटून गेल्यावर गेल्या आठवड्यात गुरूवारी, त्या मुलीचा अल्पवयीन भाऊ, त्याच्या मित्रांसह अंता रेल्वे स्टेशनजवळ आला. त्याने व त्याच्या मित्रांनी मिळून हरीव त्याच्या आणखी एका मित्रावर चाकून हल्ला केला. त्या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले. हल्ल्यात जखमी झालेल्या हरीशवर कोटा येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र तेथे त्याची मृत्यूशी चाललेली झुंज अपयशी ठरली आणि त्याने रुग्णालयताच अखेरचा श्वास घेतला.
तरूणाच्या घरात गदारोळ
हरीशच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या घरात एकच गदारोळ माजला. त्याचे कुटुंबिय शोकाकुल अवस्थेत आहेत. माहिती मिळताच अंता पोलिस तेथे पोहोचले व त्यांनी पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह पाठवला. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. मात्र या गुन्ह्याप्रकरणी अद्याप कोणालाच अटक करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.