Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोजच्या मारहाणीचा आला वीट, एक संधी मिळाली अन् तिने स्वत:च्याच पतीला…

Rajsamand News : गावातील इसमाच्या झालेल्या हत्येचा पोलिसांनी खुलासा केला. त्या इसमाचा मृत्यू नैसर्गिक नसून कोणीतरी पद्धतशीरपणे त्याचा खून केला होता. मात्र खुन्याचे नाव समोर आल्यावर गावकरीही हादरले.

रोजच्या मारहाणीचा आला वीट,  एक संधी मिळाली अन् तिने स्वत:च्याच पतीला...
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 5:25 PM

जयपूर | 9 ऑक्टोबर 2023 : पती-पत्नीचं नातं जन्म-जन्मांतरीचं असतं. संपूर्ण आयुष्यातील सर्वाधिक काळ हा आपण आपल्या जोडीदारासोबत घालवतो. प्रेम, माया, काळजी, परस्परविश्वास यावर हे नातं भक्कमपण उभमं असतं. आणि आदरही महत्वाचा. पण नात्यात तोच नसेल तर एक जण दुसऱ्याला कसाही वागवू लागतो, गृहीत धरू लगातो आणि हळूहळू त्या नात्याला तडा जाऊ लागतो. काही घटनांमध्ये प्रकरण मारामारीपर्यंत जातं. पत्नीला मारहाण करणारे अनेक जण आजूबाजूला असतात, पण त्याकडे खासगी प्रश्न समजून आपण सरळ दुर्लक्ष करतो.

पण या हाणामारीचा कधीतरी विस्फोट होता, आणि त्यातून घडू नये ते घडतं. अशीच एक घटना राजस्थानच्या एका गावात घडली. पतीसोबतच्या रोजच्या भांडणाला, हाणामारीला वैतागलेल्या पत्नीने एक संधी मिळताच असं काही केलं की तुम्ही त्याचा विचारही करू शकणार नाही. एका क्षणा तिने या समस्येचा निकाला लावत मुक्त होणं पसंत केलं. त्यासाठी तिला स्वत:च्याच हाताने स्वत:चं कुंकू पुसाव लागलं पण तरीही तिने ते केलंच. आयुष्यभर जे सहन केलं , ते सहन करण्याची शक्ती संपली तिची बहुतेक.

राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील कांकरोली पोलीसांनी एका इसमाच्या हत्येचा अखेर उलगडा केला. राज्यवास गावात राहणाऱ्या किशनलाल घानीवाल यांची 1 ऑक्टोबर रोजी हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी त्यांची पत्नी मनोहरीबाई हिलाच खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. 1 ऑक्टोबर रोजी किशनलाल यांचा मृतदेह त्यांच्याच घरात रक्ताने माखलेला अवस्थेत आढळून आला. यावरून पोलिसांनी प्रथमदर्शनी हा खून मानून या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना किशनलालच्या पत्नीविरुद्ध खुनाचे महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. त्यानंतर पोलिसांनी मनोहरीबाईला अटक केली. यामुळे संपूर्ण गावातच खळबळ माजली होती.

स्वत:चं कुंकू स्वत:च्याच हाताने पुसलं

या हत्येप्रकरणी अटक केल्यानंतर पोलिसांनी या महिलेची चौकशी केली असता तिने खुनाची कबूली दिली. पती किशनलाल हा दररोज मारहाण करायचा, बेदम पिटाई करायचा, त्याला वैतागूनच हे पाऊल उचलल्याचं तिने सांगितलं. पोलिसांच्या सांगण्यानुसार, किशनलाल याला चक्कर येण्याचा त्रास होता. घटनेच्या दिवशी देखील जेवायला बसल्यावर त्याला अचानक चक्कर आली आणि तो खाली कोसळला. बेशुद्ध झाला. याच परिस्थितीचा फायाद घेऊन त्याच्या पत्नीने त्याच्या डोक्यावर वार केले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.