Sharad Mohol Murder | शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंडला अटक

Sharad Mohol Murder | शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. मुंबईमधील एका फार्म हाऊसवर पोलिसांनी मुख्य आरोपीला पकडलं आहे. या आरोपींमुळे शरद मोहोळ याच्या हत्येमागील नवं काही कारण आहे का हे समजणार आहे.

Sharad Mohol Murder | शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंडला अटक
Sharad Mohol Munna Polekar Case Update
Follow us
| Updated on: Jan 15, 2024 | 12:04 PM

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी पकडलं आहे. मुन्ना पोळेकर हा फक्त मोहरा होता हे  समोर आलं आहे. कारण हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड रामदास मारणे याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 5 जानेवारी 2024 ला दिवसाढवळ्या झालेल्या शरद मोहोळ याच्या हत्येने पुणे हादरून गेलं होतं. पोलिसांनी गोळ्या घालणाऱ्या आरोपींना पकडलं खरं पण या हत्येमागचे खरा मास्टरमाईंड वेगळा कोणतरी असावा असा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी अखेर या आरोपीला पकडलं असून आता रामदास उर्फ वाघ्या मारणे याने मोहोळला का संपवलं? पोलीस याबाबत काय माहिती देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुख्य आरोपी रामदास मारणेसह त्याच्या सहा साथीदारांना अटक केली आहे. रामदास मारणे याच्यासोबत विठ्ठल शेलार हे नावसुद्धा समोर आलं आहे. पनवेल येथील वाशीत एका फार्म हाऊसवर गुन्हा शाखेने पनवेल पोलिसांनी मदत घेत अटक केली आहे. यामधील तीन जण हे आरोपी आहेत. तर तीन जण संशयास्पद असल्याची माहिती समोर आली आहे. पनवेल पोलिसांनी आरोपींना पुणे पोलिसांकडे सोपवलं आहे. रामदास मारणे नेमका कोण? याचा मारणे टोळीशी काही संबंध आहे का? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत.

पोलीस तपासामध्ये शरद मोहोळ याच्यावर गोळ्या घालणारा आरोपी मन्ना पोळेकर याचे एक रेकॉर्डिंग समोर आलं होतं. ज्यावेळी पोळेकर कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होता त्यावेळी त्याने एका नातेवाईकाकडून सिम कार्ड घेतलं होतं. या सिम कार्डवरून त्याने संतोष कुरपे याला फोन केला होता. त्यावर, गेम केला मास्टरमाईंडला सांगा, असं संभाषण झालं होतं. आता कुरपे हा सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे तो मास्टरमाईंड रामदास मारणे आणि विठ्ठल शेलार हे आता पोलीस तपासामध्ये समोर येणार आहे.

हे सुद्धा वाचा

शरद मोहोळला कसा संपवला?

दरम्यान, शरद मोहोळ याची 5 जानेवारी 2024 ला  दुपारी दीडच्या सुमारास हत्या झाली. मोहोळचा साथीदार मुन्ना पोळेकर याने त्याच्यावर पाठीमागून गोळीबार केला होता. आधीच आपले दोन साथीदार त्याने बाहेर ठेवले होते. मोहोळसोबत बाहेर पडताच त्याने पहिली गोळी चालवली त्यानंतर त्याच्या साथीदारांनी गोळ्या मारत मोहोळ याला जागीच ठार केलं. पुण्यात या हत्येमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती, आरोपींना पोलिसांनी त्याच रात्री शिरवळदरम्यान पकडत अटक केली होती.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.