गाडीला कट लागला सांगून पादचाऱ्यांना लुटायचे, पोलिसांनी असा केला पर्दाफाश

गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवली परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केल्याने पोलिसांनी विशेष पथके तयार करत या चोरट्यांचा शोध सुरू केला.

गाडीला कट लागला सांगून पादचाऱ्यांना लुटायचे, पोलिसांनी असा केला पर्दाफाश
गाडीला कट लागला सांगून पादचाऱ्यांना लुटायचे, टोळी अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 1:52 AM

डोंबिवली : स्टेशनकडे चालत जाणाऱ्या प्रवाशांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीला डोंबिवली रामनगर पोलिसां (Ramnagar Police)नी बेड्या ठोकल्या आहेत. या सात जणांच्या टोळीत तीन रिक्षा चालकां (Auto Divers)सह दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सागर उर्फ मुन्ना शर्मा, जेम्स सुसे, सत्यकुमार कनोजिया, सचिन ऊर्फपिल्लु राजभर, सोनू कनोजिया अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामधील मुन्ना, जेम्स व सत्यकुमार हे रिक्षाचालक असून तेच मुख्य सूत्रधार आहेत. आपल्या लहानपणीचे मित्र व दोन अल्पवयीन मुलांना घेऊन रेकी करत प्लॅनिंग करत असत.

गेल्या पाच वर्षापासून सुरु होती लुटमार

रात्रीच्या सुमारास सर्वजण एकत्र येत निर्जनस्थळी पादचाऱ्याला गाठत. त्याच्या गाडीसमोर रिक्षा आडवी लावत. गाडीला कट लागल्याचे सांगत नुकसान भरपाई मागण्याच्या बहाण्याने चाकूचा धाक दाखवून लुटत असत. गेल्या पाच वर्षापासून ही लुटमार सुरु आहे. आरोपी एक मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत होते.

चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके

गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवली परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केल्याने पोलिसांनी विशेष पथके तयार करत या चोरट्यांचा शोध सुरू केला. या दरम्यान काही आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत ठाकुर्ली येथील म्हसोबा चौक येथे येणार असल्याची माहिती डोंबिवली रामनगर पोलिसांच्या पथकाला मिळाली होती.

हे सुद्धा वाचा

या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक योगेश सानप, बळवंत भराडे, पोलीस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, सुनील भणगे यांनी म्हसोबा चौक येथे सापळा रचला. रात्रीच्या सुमारास सात जण या ठिकाणी संशयास्पदरित्या फिरताना या पथकाला आढळले.

आरोपींकडून दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त

पोलिसांनी तात्काळ या सर्वांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांच्या झडतीत पोलिसांना धारदार कोयता, चाकू, कटावणी, स्क्रू डायव्हर अशा घातक शस्त्रांसह मिरचीची पूड आणि एक नायलॉन दोरी आढळून आली. यामुळे या सर्वांना पोलिसांनी अटक करत त्यांची कसून तपासणी केली. दिवसा रिक्षाचालक म्हणून वावरत रात्री मित्रांच्या मदतीने दरोडा टाकत असल्याचे स्पष्ट झाले.

मागील 5 वर्षापासून म्हणजेच 2018 पासून ही टोळी याच परिसरात सक्रीय आहे. एकट्या दुकट्या प्रवाशाच्या समोर रिक्षा आडवी लावत गाडीला कट लागल्याचे सांगत चाकूचा धाक दाखवून लुटत होते. हे सर्व जण त्याच परिसरात राहणारे असले तरी मुळचे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि हरियाणाचे रहिवासी आहेत. तपासा दरम्यान अटक आरोपींकडून एक रिक्षा, दोन बाईक, दोन महागडे मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती एसीपी सुनील कुराडे यांनी दिली. (Ramnagar police arrested a gang that robbed passengers in Dombivali)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.