सासूच्या चहात बेशुद्धीचे औषध टाकले, आणि जावयाने नको ते केले, वर अश्लिल फोटो काढून…

काही दिवसांनी जावई पुन्हा घरी आला आणि त्याने पुन्हा तिला तिची अश्लिल छायाचित्रे दाखविली आणि पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. परंतू...

सासूच्या चहात बेशुद्धीचे औषध टाकले, आणि जावयाने नको ते केले, वर अश्लिल फोटो काढून...
cup-of-teaImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 6:34 PM

मुंबई : सासु आणि जावयाचे नाते आई आणि मुलाप्रमाणे असते. परंतू आताच्या कलयुगात माणूस केवळ श्वापदाप्रमाणे प्रत्येक नात्यातील मर्यादा सोडून वागत आहेत. अशाच एका प्रकरणात एका जावयाने अक्षरश: सासू आणि जावयाच्या पवित्र नात्यालाच काळीमा फासत असे काही केले ही चारचौघात तिला तोंड लपवायला जागा उरलेली नाही. एका जावयाने आपल्या सासूला चहातून बेशुद्धीचे औषध पाजून तिला बेशुद्ध करीत तिचा गैरफायदा घेतल्याचे उघडकीस आले आहे. या सासूने अखेर कोर्टात धाव घेत जावयाची तक्रार केली आहे.

युपीच्या बांदा येथील या जावयाने हा माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार केला आहे. त्याने आपल्या सासूच्या चहात नशेचा पदार्थ टाकून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर त्याने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिची अश्लिल छायाचित्रेही आपल्या मोबाईल फोनवर काढली. त्यानंतर ही छायाचित्रे दाखवून त्याने तिला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. तिला पुन्हा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. परंतू सासू त्याच्या वासनेला हाणून पाडत त्याला स्पष्ट नकार दिल्याने त्या वासनांध जावयाने तिची छायाचित्रे थेट व्हायरल केल्याने त्याच्या सासूला कुठेही तोंड दाखवायलाही जागा उरली नाही. सासूने त्यानंतर पोलिस तक्रार केली. परंतू पोलीसांनी देखील दखल न घेतल्याने अखेर या सासूला कोर्टाचे दरवाजे ठोठावावे लागले. अखेर कोर्टाच्या आदेशाने या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

बदनामीच्या भीतीने लपविले

हा प्रकार कालिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडला आहे. या गावात रहाणाऱ्या या महिलेच्या बाबतीत वर्षभरापूर्वी हा भयानक प्रकार घेतला. त्याचे झाले काय नात्याने जावई असलेला पैलानी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बडा गावचा रहीवासी अनिल एके दिवशी या महिलेच्या घरी आला. आपल्या पाहुण्याचे स्वागत आणि पाहुणचार म्हणून या महिलेने त्याच्यासाठी चहा बनविला. तेव्हा जावयाने त्याला पाणी प्यायचे आहे असे सांगितले त्यामुळे त्या पाणी आणण्यासाठी आत स्वयंपाक घरात गेल्या. त्याचा फायदा उचलत त्याने आपल्या घरात कोणी नाही हे पाहून त्याने चहात बेशुद्धीचे औषधे घातले. त्यानंतर तिने जावयासोबत चहा घेतला. चहा घेताच ती महिला बेशुद्ध झाली. त्यानंतर जावयाने तिच्यावर अतिप्रसंग केला. अब्रु लज्जेखातर बदनामीच्या भीतीने तिने ही बाब कोणालाच सांगितली नाही.

न्यायालयात धाव घेतली

काही दिवसांनी जावई पुन्हा घरी आला आणि त्याने पुन्हा तिला तिची अश्लिल छायाचित्रे दाखविली आणि पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. परंतू सासूने त्यास स्पष्ट नकार देत पुन्हा असे केल्यास पोलिसांकडे जाण्याची धमकी दिली. परंतू त्याच्यावर काही परिणाम न होता. त्याने ती अश्लिल चित्रे सोशल मिडीयावर व्हायरल केली. त्यानंतर या प्रकरणात पोलीस ठाण्यात जावयावर गुन्हा दाखल करण्यास सासू गेली असता. पोलीसांनी लक्ष दिले नाही. त्यानंतर पोलिस अधिक्षकांना भेट देऊनही कारवाई न झाल्याने तिने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करीत तपास करण्याचे आदेश दिले. कालिंजर पोलिसांनी हे प्रकरण जुने असून तपास केल्यानंतरच योग्य ती कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.