सातारा : राज्यातल्या महिला अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीयेत. रोज अशा अनेक बातम्या मनाला चटका लावून जातात. साताऱ्यातून एक अशीच मनाला चटका लावणारी, आणि संताप वाढवणारी बातमी समोर आली आहे. साताऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Crime) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना आखत आहे. मात्र तरीही महिला अत्याचाऱ्याच्या घटना घडत आहे. कित्येकदा नातेवाईकांकडूनच अत्याचार होण्याच्या अनेक घटना समोर येतात. साताऱ्यातही काहीसा असाच प्रकार घडलाय. नात्यातल्या एका तरुणानेच या अल्पवयीन मुलीचा (Minor Girl) घात केला. या अत्याचाराच्या घटनेने सातारा (Satara Crime) शहरासह महाराष्ट्रत खळबळ माजली आहे. या घटनेनंतर प्रशासनही आता अलर्ट मोडवर आलं आहे.
नेमका प्रकार काय घडला?
सातारा शहरालगत असणाऱ्या एका उपनगरात ही खळबळजनक घटना घडली आहे. 11वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना तिच्याच नात्यातील एका 22 वर्षीय युवकाने तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही तरुणी घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर संबंधित युवक हा फरार झाला होता. मात्र अवघ्या काही तासातच पोलिसांनी या युवकाचा तातडीने शोध घेतला आणि याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस या तरुणाविरोधात अत्यंत कठोर पाऊलं उचलताना दिसून येत आहे. पोलिसांकडून या गुन्ह्यात वेगाने काम सुरू आहे. या घटनेने पोलीस प्रसासनाचीही झोप उडवली आहे.
पॉक्सोनुसार गुन्हा दाखल
हा अत्याचाराचा सर्व प्रकार पीडित युवतीने तिच्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. त्यानंतर पोलीस ठाण्यात येऊन संबंधित युवकाविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सुत्रं वेगाने हलवली. काही तासातच पोलिसांनी 22 वर्षीय युवकावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सातारा शहर पोलिसांनी युवकाला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. यातही आणखीही काही महत्वाच्या बाबी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
डॉक्टर दाम्पत्याला मारहाण करत लाखो रुपये लंपास, कशी केली ही जबरी चोरी?
दारुच्या नशेत नातुची आजीला मारहाण, महिला कार्यकर्त्यांनी घडवली शिवसेना स्टाईलने अद्दल
Sachin Vaze : न्यायालयाच्या दणक्यानंतर सचिन वाझेची याचिका मागे, नेमकं प्रकरण काय?