मोबाईलला नेटवर्क नसल्याने घराबाहेर आलेल्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, दोन जणांवर गुन्हा

एका अल्पवयीन युवतीवर दोन तरुणांनी मध्यरात्रीच्या सुमारास बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. (Rape On Minor Girl in Aurangabad) 

मोबाईलला नेटवर्क नसल्याने घराबाहेर आलेल्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, दोन जणांवर गुन्हा
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 9:51 AM

औरंगाबाद : शेतवस्तीवर राहणाऱ्या एका अल्पवयीन युवतीवर दोन तरुणांनी मध्यरात्रीच्या सुमारास बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पैठण तालुक्यातील थेरगाव या गावातील पाचोड परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोड पोलिसात दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Rape On Minor Girl in Aurangabad)

पाचोडी पोलिसात शेतीवस्तीवर राहणाऱ्या घरामध्ये मोबाईलला नेटवर्क नसल्याने संभाषणास अडथळा येत होता. यामुळे पीडित मुलगी घराच्या बाहेर येऊन मोबाईलला नेटवर्क शोधत होती. मात्र त्याच वेळी ती बाहेर येताच त्या दोन तरुणांनी तिचं तोंड दाबून तिला शेतामध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

या घडलेल्या घटनेबाबत जर कोणाला सांगितले तर तुला मारुन टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर त्या दोघांनी घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र या अल्पवयीन मुलीने रडत रडत घडलेला सर्व प्रकार सकाळी तिच्या आई-वडिलांना सांगितला.

यानंतर पीडित मुलीच्या आईवडिलांनी दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. जुनेद दस्तगीर पठाण (23) आणि दिपक आहेर अशी या दोघा आरोपींची नावे आहेत. कलम 376 सह इतर कलमांतर्गत त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (Rape On Minor Girl in Aurangabad)

संबंधित बातम्या : 

भर रस्त्यात लोखंडी कोयत्याने केक कापणं महागात, बर्थडे बॉयसह मित्रांवर गुन्हा

जीवनसाथी डॉट कॉमवरून महिलांची फसवणूक करणाऱ्याला अटक; 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.