बंगळुरू | 24 जुलै 2023 : महिलांविरोधातील गुन्हे कमी होताना दिसत नाहीयेत. गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी असलेले कायदे फक्त कागदावरच दिसत असून आजही महिलांना सुरक्षितपणे रस्त्यावर फिरता येत नाही. रॅपिडो ड्रायव्हर्सच्या गैरवर्तनाचे (rapido bike rider)अनेक किस्से यापूर्वी समोर आले असताना मेट्रो सिटी असणाऱ्या बंगळूरूमध्ये आणखी एका तरूणीला असाच एका धक्कादायक अनुभव आला आहे.
रॅपिडो टॅक्सी ड्रायव्हरने राईड सुरू असताना किळसवाणे कृत्य केले. एवढेच नव्हे तर राईड संपल्यावरही प्रवासी महिलेला अयोग्य मेसेजेस पाठवत तिला त्रासही दिला. त्या तरूणीने ट्विटरवर या संदर्भातील मेसेजेसचे स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर लैंगिक छळाचे (sexual harassment) हे प्रकरण उजेडात आले आहे. अथिरा पुरुषोत्तम असे त्या तरूणीचे नाव असून ती बंगळूरूची रहिवासी आहे. तिने तिचा भयानक अनुभव शेअर केला आहे.
नक्की काय झालं ?
मणिपूर येथील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झाल्यानंतर घरी जाण्यासाठी अथिराने रॅपिडो बाईकचे बूकिंग केले होते. मात्र ॲपवर मेन्शन केलेली बाईक न आणता ड्रायव्हरने दुसरी बाईक आणल्याचे पाहून ती हैराण झाली. रजिस्टर्ड बाईक सर्व्हिसिंगला गेल्याने ही बाईक आणल्याचे ड्रायव्हरने स्पष्ट केले असता अथिराने ॲपवरील बूकिंग चेक करत ते कन्फर्म केले व घराच्या दिशेने प्रवास सुरू केला. मात्र राईड सुरू असताना सुनसान रस्त्यावर आल्यावर बाईक ड्रायव्हरने हस्तमैथून सुरू केल्याने ती दचकलीच. ‘ प्रवास सुरू असताना आम्ही एका सुसान रस्त्यावर आलो, तेव्हा आजूबाजूला एकही गाडी नव्हती. ड्रायव्हर एका हाताने बाईक चालवत होता आणि दुसऱ्या हाताने नको ते कृत्य ( हस्तमैथून) करत होता. सुरक्षिततेच्या काळजीमुळे मी काहीच न बोलता शांत राहिले’ असे अथिराने तिचा अनुभव लिहीताना नमूद केले.
त्यानंतर तिने बाईक टॅक्सीचे ऑनलाइन पैसे दिले आणि तिचा पत्ता कळू नये म्हणून ड्रायव्हरला तिला घरापासून सुमारे 200 मीटर दूर सोडण्यास सांगितले. पण तो किळसवाणा प्रकार तिथेच थांबला नाही. राइड संपल्यावरही त्या ड्रायव्हरने मला सतत व्हॉट्सॲपवर कॉल आणि मेसेज करायला सुरुवात केली. त्याचा छळ थांबवण्यासाठी मला त्याचा नंबर ब्लॉक करावा लागला, असे अथिरा म्हणाली.
Thread ?#SexualHarassement
Today, I went for the Manipur Violence protest at Town Hall Bangalore and booked a @rapidobikeapp auto for my way back home. However, multiple auto cancellations led me to opt for a bike instead. pic.twitter.com/bQkw4i7NvO— Athira Purushothaman (@Aadhi_02) July 21, 2023
त्यानंतर अथिराने तिला रॅपिडो ड्रायव्हरकडून आलेल्या मेसेजेसचा स्क्रीनशॉट शेअर केला. त्याने तिला किसिंग इमोजी आणि हार्ट इमोजीसह “लव्ह यू” असा संदेश पाठवले होते. तो तिला वेगवेगळ्या नंबरवरून कॉलही करत होता, असेही तिने नमूद केले. मीडिया प्रोफेशनल म्हणून काम करणाऱ्या अथिराने हा सर्व प्रकार कथन करत तिच्या थ्रेडमध्ये रॅपिडोच्या ऑफिशि्ल ट्विटर अकाऊंटलाही टॅग केले असून याप्रकरणाकडे वेळीच लक्ष घाला आणि ड्रायव्हर्सची पार्श्वभूमी तपासत जा, असा सल्ला दिला आहे.
बंगळुरू शहर पोलिसांनी या घटनेची दखल घेत, एसजे पार्क पोलिस स्टेशनला आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
We have informed to @sjparkps to take necessary action in this regard, Please DM your contact number.
— ಬೆಂಗಳೂರು ನಗರ ಪೊಲೀಸ್ BengaluruCityPolice (@BlrCityPolice) July 21, 2023
तर रॅपिडोनेही यावर प्रतिक्रिया देत एक निवेदन जारी केले आहे. ‘ या दुर्दैवी घटनेबद्दल आम्हाला मनापासून खेद वाटत असून संबंधित ड्रायव्हरला तत्काळ निलंबित करून कारवाई करण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले. “आम्ही पीडित ग्राहकाची प्रामाणिकपणे माफी मागतो आणि तिला तसेच आमच्या सर्व ग्राहकांना खात्री देतो की, आम्ही Rapido ला सर्वांसाठी अधिक सुरक्षित आणि अधिक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी पूर्णपणे समर्पित आहोत. आम्ही ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतो,” असे कंपनीने म्हटले आहे.
दरम्यान रॅपिडो ड्रायव्हरच्या लाजिरवाण्या कृत्याचे हे पहिलेच उदाहरण नाही. आणखी एका ट्विटर युजरने रॅपिडो ड्रायव्हरवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. ड्रायव्हरच्या चॅटचा स्क्रीनशॉटही तिने शेअर केला आहे. त्या मुलीने आपले लोकेशन व्हॉट्सॲपच्या माध्यमातून रॅपिडो ड्रायव्हरला सांगितले होते, त्यानंतर ड्रायव्हरने तिचा पाठलाग करून मेसेजद्वारे मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर काही दिवसांनीच बंगळुरुमध्ये एका 30 वर्षीय महिलेसोबतही असाच प्रकार घडला. त्यानंतर महिलेने कुठलीही पर्वा न करता धावत्या रॅपिडो बाईकवरुन उडी मारली. ड्रायव्हर असलेल्या बायकरने OTP चेक करण्याच्या बहाण्याने या महिलेकडून तिचा फोन घेतला. त्यानंतर त्याने एअर पोर्टच्या दिशेने बाईक न्यायला सुरुवात केली. या दरम्यान ड्रायव्हरने महिलेला पकडण्याचा प्रयत्न करत नको तो स्पर्श केला होता. या महिलेने स्व:ला वाचवण्यासाठी धावत्या बाईकवरुन उडी मारली.