मंगेझरीत दुर्मीळ काळ्या बिबट्याची शिकार, आरोपींकडून लाखो रुपयांचे वन्यप्राण्यांचे अवयव जप्त
ताब्यात घेतलेल्या आरोपींचा कसून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून अजून मोठे गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांची टोळी किती जणांची आहे. प्राण्यांच्या अवयवांची विक्री कुठे करतात या सगळ्याची उकल होणार आहे.
शाहिद पठाण, गोंदिया : महाराष्ट्रात काळ्या बिबट्याचे (Maharashtra leopard) अस्तित्व दुर्मीळ असतानाच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील (Nagzira Sanctuary) एकमेव काळ्या बिबट्याची 13 जानेवारी 2023 रोजी शिकार केल्याची कबुली 26 फेब्रुवारी रोजी देवरी तालुक्यातील मंगेझरी येथे अटक केलेल्या पाच आरोपींनी दिली आहे. आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे काळ्या बिबट्याचे अर्धवट जळालेले हृदय वनविभागाने जप्त (forest department) केल्याची माहिती नागझिरा नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी प्रदीप पाटील यांनी दिली आहे.
गोंदिया जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी व विक्री होणार असल्याची खात्रीलायक गुप्त माहिती विशेष व्याघ्र संरक्षण दल व नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांना मिळाली होती, व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी व पोलिस विभाग, गोंदिया यांना एक महिन्याच्या प्रयत्नानंतर पाच आरोपींना पकडण्यात यश आले. 26 फेब्रुवारी रोजी आरोपी शामलाल ढिवरू मडावी, दिवारू कोल्हारे, माणिक दारसू ताराम, अशोक गोटे, सर्व रा. मंगेझरी, पो. मुरदोली, ता. देवरी व रवींद्र लक्ष्मण बोडगेवार, रा. पालांदूर ता. देवरी या आरोपींनी मंगेझरी येथे 13 जानेवारी रोजी काळ्या बिबट्याला फासात अडकवून त्याची फुटले. आरोपींकडून आणखी मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे…..
ताब्यात घेतलेल्या आरोपींचा कसून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून अजून मोठे गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांची टोळी किती जणांची आहे. प्राण्यांच्या अवयवांची विक्री कुठे करतात या सगळ्याची उकल होणार आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक जणांवरती कारवाई करण्यात आली आहे. तरी सुध्दा प्राण्यांच्या तस्करी होत आहे. राज्यात विविध ठिकाणी प्राण्यांची तस्करी झाल्याचं विविध गुन्ह्यांमधून उघडकीस आलं आहे.