राशिदचा झाला राजू आणि हिंदू युवतीला ओढलं प्रेमात, धर्मपरिवर्तन केल्यानंतर केलं असं की…

सोशल मीडियावर बनावट नावाने खातं तयार करून आधी तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. अत्याचार करून अश्लिल व्हिडीओ बनवला. बदनामी करेन असं धमकावून निकाह करण्याच्या नावाने धर्मपरिवर्तन केलं.

राशिदचा झाला राजू आणि हिंदू युवतीला ओढलं प्रेमात, धर्मपरिवर्तन केल्यानंतर केलं असं की...
राशिदचा झाला राजू आणि हिंदू युवतीला ओढलं प्रेमात, धर्मपरिवर्तन केल्यानंतर केलं असं की...Image Credit source: TV9 Gujrat
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 1:25 PM

फतेहपूर : उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका मुस्लिम युवकाने हिंदू असल्याचा बनाव करत सोशल मीडियावर युवतीसोबत मैत्री केली. त्यानंतर कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकून तिच्यावर अत्याचार केले. तसेच पीडितेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन दोन वर्षापर्यंत शारीरिक शोषण करत राहिला. या दरम्यान पीडित तरुणी गरोदर राहिल्याने तिचा गर्भपात केला आणि तेथून फरार झाला. या प्रकरणाची पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मुस्लिम युवकने राशिदने फेसबुकवर राजू मिश्रा नावाने बनावट खातं तयार केलं होतं. त्यानंतर त्याने एका हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तसेच तिला आपल्या घरी बोलवून कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून अत्याचार केले. त्यानंतर मुलीचा अश्लील व्हिडीओ तयार केला. तसेच व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी देऊन वारंवार शारीरिक अत्याचार करत राहिला.

राशिद इतक्यावर थांबला नाही तर गाडी विकत घेण्यासाठी पीडित तरुणीकडून 4 लाख रुपये उकलले. त्यानंतर पीडित तरुणीला निकाह करत असल्याचं सांगून धर्मपरिवर्तन केले. निकाह केल्यानंतर पीडित तरुणी तीन महिन्यांची गरोदर होती. तेव्हा आरोपीने तिचा गर्भपात केला आणि तिला गुजरातमध्ये सोडून पळ काढला. पीडित तरुणीने तक्रारीत पोलिसांना ही माहिती दिली आहे.

घटनेनंतर पीडित तरुणी कशीबशी आपल्या घरी पोहोचली मात्र तिच्या कुटुंबियांनी तिला घरातून हाकलून लावलं. त्यानंतर पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मात्र या नंतरही पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. दुसरीकडे, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून चौकशीअंती कारवाई करणार असल्याचं सांगितलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.