Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दागिणे एकाचे, सोडवले दुसऱ्यानंच, बुलडाण्यातील ICICI बँकेत 44 तोळे सोनं चोरीनं खळबळ

बुलडाणा येथील आयसीआयसीआय बँकेत पती-पत्नीने गहाण ठेवलेले सोने दुसर्‍यानेच सोडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

दागिणे एकाचे, सोडवले दुसऱ्यानंच, बुलडाण्यातील ICICI बँकेत 44 तोळे सोनं चोरीनं खळबळ
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 2:25 AM

बुलडाणा : बुलडाणा येथील आयसीआयसीआय बँकेत पती-पत्नीने गहाण ठेवलेले सोने दुसर्‍यानेच सोडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी आयसीआयसीआय बँकेकडून फसवणूक झाल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे देण्यात आलीय. पळसखेड नाईक येथील अमोल दिगंबर राठोड आणि त्यांची पत्नी प्रिती अमोल राठोड यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केलीय. तसेच चौकशी करून फसवणूक करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी पीडित दाम्पत्याने केलीय (Rathod family lost 440 Gram of Gold from ICICI bank by fraud in Buldana).

अमोल राठोड यांनी 24 जानेवारी 2018 रोजी बुलडाणा येथील आयसीआयसीआय बँकेकडे 44 तोळे सोनं तारण ठेवलं. त्यांनी हे सोने तारण ठेवून त्यावर 2 लाख 8 हजार 907 रुपयांचं कर्ज घेतलं. तसेच 4 एप्रिल 2019 रोजी सोने तारण ठेवून 3 लाख 32 हजार 322 रुपयांचे कर्ज घेतलं. त्यांची पत्नी प्रिती राठोड यांनीही 2 लाख 5 हजार 684 रुपयांचं सोनं तारण कर्ज घेतले. दोघांचेही जवळपास 44 तोळे सोने असल्याचं सांगितलं जातंय.

बँकेकडून उडवाउडवीची उत्तरं

कर्ज मंजुरीची सत्यप्रत अमोल राठोड यांच्याजवळ असताना अन्य कुणीतरी व्यक्तीने त्यांचे सोने बँकेकडून सोडवून नेल्याचं आयसीआयसीआय बँकेकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे राठोड दाम्पत्याला धक्काच बसलाय. बँकेला विचारणा केली असता त्यांनी राठोड दाम्पत्याला उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणी राठोड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह पोलीस स्टेशनला तक्रार दिलीय. तसेच चौकशी करून सोने परत मिळवून द्यावे, अशी मागणी केलीय.

या प्रकरणी बुलडाणा पोलीस अधीक्षक यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी ही चौकशी सुरू केल्याचं सांगितलं जातंय. चौकशीनंतर कारवाई करू, असं आश्वासन पोलिसांनी दिलंय.

पाणी कुठं मुरतंय?

दुसरीकडे बँक मॅनेजरने या प्रकरणी मौन बाळगलंय. त्यामुळं पाणी कुठंतरी मुरतंय का? असा प्रश्न उपस्थित होतोय. शिवाय तारण ठेवलेल्या मूळ ग्राहकाला ते सोनं न देता दुसऱ्या व्यक्तीला बँकेने कसे दिले? असा मुलभूत प्रश्न देखील विचारला जातोय. यामुळे बँकेतील इतरही ग्राहकांच्या ठेवी आणि सोन्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय.

हेही वाचा :

धक्कादायक ! मॅनहोलमध्ये लपलंय काय? तब्बल 21 लाखांचं सोनं, पोलीसही हैराण

विश्वासातील नोकराकडून विश्वासघात, 53 लाखांचे हिरे-दागिने लंपास, 24 तासात नोकराला अटक

रशियाकडून 9 लाख कोटी रुपयांचं सोने खरेदी, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची नवी चाल काय?

व्हिडीओ पाहा :

Rathod family lost 440 Gram of Gold from ICICI bank by fraud in Buldana