मृतदेह घेऊन जाताना रुग्णवाहिकेच्या चालकावरच काळाचा घाला! कोकणातील रुग्णवाहिका चालक यूपीत ठार

Ratnagiri Accident : फिरोज खान असं रुग्णवाहिका चालकाचं नाव आहे. ते रत्नागिरीमध्ये रुग्णवाहिका चालवण्याचं काम करत होते

मृतदेह घेऊन जाताना रुग्णवाहिकेच्या चालकावरच काळाचा घाला! कोकणातील रुग्णवाहिका चालक यूपीत ठार
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 9:20 AM

रत्नागिरी : कोकणातील (Ratnagiri News) रुग्णवाहिका चालकाचा उत्तर प्रदेशात मृत्यू (Road Accident Death) झालाय. एका भीषण अपघातात चालक ठार झाल्यानं या चालकाचे कुटुंबीय पोरके झालेत. गुरुवारी हा भीषण अपघात घडला. रत्नागिरीहून (Ratnagiri Ambulance driver death) बिहारच्या दिशेनं रुग्णवाहिकेतून मृतदेह घेऊन तिघे जण निघाले होते. मात्र वाटेतच चालकावर काळानं घाला घातला. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चालकाचा जबर मार बसून त्याचा मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरला उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. उपचारादरम्यान रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे.

कुटुंबीयांवर शोककळा

फिरोज खान असं रुग्णवाहिका चालकाचं नाव आहे. ते रत्नागिरीमध्ये रुग्णवाहिका चालवण्याचं काम करत होते. एक मृतदेह घेऊन जाण्यासाठी ते निघाले होते. रत्नागिरी ते बिहार हा लांबचा पल्ला गाठायचा होता. रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयाबाहेर फिरोज खान यांची रुग्णवाहिका नेहमीच तत्पर असायची. यावेळीही तिघे जण रत्नागिरीहून बिहारच्या दिशेनं निघाले होते.

ट्रकला धडक, कारचा चक्काचूर

मात्र वाटेतच रुग्णवाहिकेची भीषण अपघात होऊन चालक फिरोज खान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे खान कुटुंबीयांसह रत्नागिरीतील त्यांच्या मित्र परिवाराला मोठा धक्का बसलाय. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील दुबेपूर रासेना गावाजवळ या रुग्णवाहिकेची ट्रकला जोरदार धडक बसली आणि हा अपघात घडला.

हे सुद्धा वाचा

प्रेयसीच्या धमकीला घाबरुन प्रियकराची आत्महत्या : पाहा व्हिडीओ

या अपघातामध्ये रुग्णवाहिकेचाही चक्काचूर झालाय. या रुग्णवाहिकेची झालेली अवस्था पाहून अपघातामधील धडक किती भीषण होती, याची कल्पना करता येऊ शकेल.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.