फेसबुकवरची ओळख पडली महागात; व्यापाऱ्याला 30 लाखाला गंडा, दापोली पोलिसात तक्रार

प्रलोभन दाखवून जालगाव येथील एका व्यापाऱ्याची तब्बल 30 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

फेसबुकवरची ओळख पडली महागात; व्यापाऱ्याला 30 लाखाला गंडा, दापोली पोलिसात तक्रार
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 4:14 PM

रत्नागिरी : एका महिलेने 93 लाख रुपये किमतीचे पाउंड कुरियरने पाठवले आहेत (Fraud By Facebook). ते कुरियर विमानतळावरुन सोडवून घ्या, असे प्रलोभन दाखवून जालगाव येथील एका व्यापाऱ्याची तब्बल 30 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दापोली पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत (Fraud By Facebook).

दापोली जालगाव येथील विजय प्रभाकर खोत यांची जानेवारी 20 मध्ये अमेलिया जॅक्सन नावाच्या लंडन येथील एका महिलेशी फेसबुकवरुन ओळख झाली. फेब्रुवारीमध्ये या महिलेने खोत यांच्या व्हॉट्सअॅपवर एक पार्सल पाठवले आहे, असा मेसेज केला. पार्सलमध्ये असलेल्या वस्तूंचे फोटोही व्हॉट्सअॅपवर टाकले.

त्यानंतर प्रिया शेठ या महिलेने तुमचे विमानतळावर कुरियर आले आहे. त्यात फोटोत दाखविलेल्या वस्तू आणि 93 लाख रुपये किमतीचे पाउंड आहेत. त्यांनी यासंदर्भात कस्टम आणि रिझर्व्ह बँक या शासकीय आस्थापना यांची प्रमाणपत्रेही पाठविली होती. ही कागदपत्रे खरी असतील हे गृहीत धरुन खोत यांनी त्यांच्याकडे मागणी केली जात होती. तसे बँकेत पैसे भरले, फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने खोत यांना दोन एटीएम कार्डही पाठवले. या एटीएमद्वारे खोत यांनी 2 वेळा पैसेही काढले. या सर्व प्रकारात खोत यांनी तब्बल 30 लाख 73 हजार 100 रुपये या व्यक्तींनी पाठविलेल्या ई-मेलमध्ये दिलेल्या बँक खात्यात भरणा केले.

त्यानंतर खोत यांनी कुरियर काही आले नाही. त्यामुळे आपण फसले गेल्याचे विजय खोत यांचे लक्षात आल्यावर त्यांनी दापोली पोलीस ठाणे गाठून अमेलिया जॅक्सन, प्रिया शेठ, पूजा शर्मा यांच्याविरोधात प्रलोभन दाखवून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, दापोली पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील करत आहेत (Fraud By Facebook).

फेसबुक, व्हॉट्सअॅप अशा सोशल मीडियातून फसवणुकीचे प्रकार घडत असून या लोकांच्या प्रलोभनाला आकर्षित होऊन अनेक व्यक्ती त्यांनी आयुष्यभराची जमवलेली पुंजी पणाला लावत आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांना मोठा धक्का बसत आहे, त्यामुळे कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी केले आहे.

Fraud By Facebook

संबंधित बातम्या :

रेखा जरे हत्या प्रकरण : फरार आरोपी बाळ बोठेंचा जामिनासाठी अर्ज; सुनावणी लांबणीवर

किरकोळ वादातून तरुणाच्या अंगावर गाडी घालून हत्या, पोलिसांनी तीन तासात आरोपींना ठोकल्या बेड्या

धुळ्यात कपड्याच्या दुकानात पोलिसांची छापेमारी, तस्करी होणाऱ्या 25 तलवारी जप्त

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.