मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, पण त्याच्या मनात वेगळचं होतं, तिनं पोलीस स्टेशन गाठून आपबीतीच सांगितली
पीडित तरुणीच्या आरोपावरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात बलात्कार, फसवणूक, मारहाण अशा विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : एकीकडे व्हॅलेंटाईन विकची धामधूम सुरू असतांना दुसरीकडे एक तरुणी आपल्या प्रियकराच्या विरोधात तक्रार देण्यासाठीचा विचार करत होती. दोन दिवसांपूर्वीच एका तरुणीने कधीकाळी प्रियकर असलेल्या व्यक्तिच्या विरोधात तक्रार ( Nashik Crime News )दिली आहे. त्यावरून मुंबई नाका पोलीस ( Mumbai Naka Police ) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार आणि आर्थिक लूट केल्याचा मुख्य आरोप पीडित तरुणीने केला आहे. पीडित तरुणीची फिर्याद ऐकून पोलीसही चक्रावून गेले. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच या धक्कादायक घटणेने खळबळ उडाली आहे.
मुंबई नाका पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, नाशिक शहरातील मदिना चौक भागात हा संपूर्ण प्रकार घडला आहे. संशयित आरोपी आणि पीडित तरुणी हे दोघेही एकमेकांच्या परिचयाचे आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. त्याच दरम्यान संशयित आरोपी याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचे म्हंटले आहे. याशिवाय वेळोवेळी मारहाणही केल्याचे म्हंटले आहे.
याशिवाय संशयित आरोपीने पीडित तरुणीकडून लाखों रुपये उकळले असल्याचेची तक्रारीत म्हंटले आहे. यामध्ये पीडित तरुणीकडून तीन लाख रुपयांची रक्कम घेतली होती. याशिवाय बुलेट गाडी घेण्यासाठी 80 हजार रुपये दोनदा घेतले होते.
काही दिवस उलटल्यानंतर पुन्हा दुचाकी घेण्यासाठी संशयित तरुणाने 80 हजार रुपयांची रक्कम घेतल्याचा आरोपही पीडित तरुणीने केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असतांना तरुणाने फसवणूक केल्याचा आरोप पीडितेचा आहे.
पीडित तरुणीच्या आरोपावरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात बलात्कार, फसवणूक, मारहाण अशा विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार मुंबई नाका पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात असून पीडित तरुणीच्या नातेवाईकांकडून आरोपीच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. सध्या फरार झाल्याची माहिती समोर येत असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.
व्हॅलेंटाईन विकमध्ये प्रेमाच्या चर्चा सुरू असतांनाच दुसऱ्या बाजूला मुंबई नाका पोलीस ठाण्यात प्रेमप्रकरणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे तरुणाईमध्ये उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.
प्रेमसंबंध, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, आर्थिक लूट होत असल्याचे प्रकार समोर येत असल्याने तरुणाईमध्ये भीतीचे वातावरण पसारले असून मुंबई नाका पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.