माझी बायको बुडतेय….गोवा हॉटेलच्या मॅनेजरने केला ड्रामा, अखेर….
गोव्याच्या रामबाग बिचवर फिरायला गेलेल्या पती आणि पत्नीत भांडण होऊन त्याची परिणीती पत्नीच्या हत्येत झाल्याचे धक्कादायक प्रकरण शुक्रवारी घडले. या प्रकरणात पतीने हा अपघात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. परंतू अखेर नियतीच्या मनात काही वेगळेच होते. आणि त्याची पोल उघड झाली.
गोवा | 21 जानेवारी 2024 : गोवा येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीने आपल्या पत्नीलाच बिचवर पाण्यात बडवून ठार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकाराला त्याने अपघात भासविण्याचा प्रयत्न केला. आपण आईस्क्रीम खरेदी करण्यासाठी गेलो होतो. इतक्यात पत्नीला लाटांनी आत ओढले आणि ती बुडाली असा बहाणा त्याने केला. पोलिसांनाही सुरुवातीला हेच खरे वाटले, परंतू नियतीच्या मनात काही औरच होतं आणि त्याचे बिंग फुटलं आणि पत्नीच्या हत्येप्रकरणात गोव्यातील एका पॉश हॉटेलचा मॅनेजर असलेल्या या पतीला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या.
दक्षिण गोव्यातील एका लक्झरी हॉटेलचे मॅनेजर असलेल्या गौरव कटियार ( 29) याने गोव्याच्या काबोडी रामा समुद्र किनारी त्याची पत्नी दीक्षा गंगवार ( 27 ) हीला फिरायला नेले होते. तेथे काही कारणाने दोघांमध्ये भांडण झाले. गौरव आणि दीक्षा यांच्यात शब्दाला शब्द वाढत गेला आणि त्याने तिला समुद्रात ढकलून दिले. त्यानंतर त्या आरडा ओरडा करीत नागरिकांना बोलावले. आपण पत्नीसाठी आईस्क्रीम आणायला गेलो आणि ती पाण्यात पोहत असताना बुडाली असा बनाव त्याने रचला. पोलिसांनी देखील सुरुवातीला हे खरे वाटले. परंतू नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
…आणि पोल उघड झाली
पोलिसांना शुक्रवारी दुपारी समुद्र किनारी दीक्षाचा मृतदेह रामबाग बिचवर सापडला. शुक्रवारी दुपारी 3.45 वाजता हा प्रकार घडला. पोलिसांना तिच्या शरीरावर जखमा आढळल्याने त्यांना संशय आला. पोलिसांनी स्थानिक सीसीटीव्हींची पाहणी केली. समुद्र किनाऱ्यावरील काही जणांची चौकशी केली. अखेर एका स्थानिकाने मोबाईल व्हिडीओ केलेल्या शुटींगमध्ये गौरव समुद्रात जाताना आणि येताना दिसला. त्यामुळे पोलिसांनी त्याला आपला खाकीचा हिसका दाखविला. त्यानंतर त्याने आपल्या अनैतिक संबंधावरुन पत्नीशी वाद झाल्याने तिची हत्या केल्याची कबूली दिली. दीक्षा उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील रहाणारी आहे. गौरवही लखनऊचा रहिवासी असून एक वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. दक्षिण गोवा कोलवा परिसरात तो एक रेस्टॉरंट चालवित होता. आता गोवा पोलिसांनी गौरवला 302 कलमाखाली अटक केली आहे.