मित्रांसोबत बिर्याणी खायला गेला तो परत आलाच नाही… हॉटेलमधील ‘त्या’ प्रकारामुळे सर्वच हादरले !

हैदराबादी बिर्याणी खूपच लोकप्रिय आहे. मात्र हैदराबादमधील एका इसमाला ती बिर्याणी खायला जाणं खूपच महागात पडलं. हा इसमा मित्रांसोबत जेवणासाठी बाहेर गेला पण तो परत आलाच नाही. त्याच्यासोबत नक्की काय घडलं ?

मित्रांसोबत बिर्याणी खायला गेला तो परत आलाच नाही... हॉटेलमधील 'त्या' प्रकारामुळे सर्वच हादरले !
Follow us
| Updated on: Sep 12, 2023 | 12:26 PM

हैदराबाद | 12 सप्टेंबर 2023 : हैदराबाद हे नवाबांचे शहर मानले जाते. मात्र आता याच शहरामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेथे एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणे एका इसमाच्या जीवावरच बेतले. मित्रांसोबत जेवण्यासाठी तो बाहेर गेला खरा पण घरी परत आलाच नाही. आली ‘ती’ दु:खद बातमीच, जी ऐकून त्याच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली ! रेस्टॉरंटमध्ये मित्रांसोबत जेवायला गेलेल्या इसमाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची (customer beaten by staff in hotel) धक्कादायक माहिती समोर आली आहे. आणि ही मारहाण करणारे दुसरे-तिसरे कोणीच नव्हते, ते तर त्याच रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कर्मचारी होते. त्यांनी असं का केलं ? तिथे असं नेमकं काय घडलं की हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाला जीव गमवावा लागला ? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत इसम हा ३० वर्षांचा होता. रविवारी रात्री तो त्याच्या मित्रांसोबत जेवणासाठी मेरेडियन रेस्टॉरंटमध्ये गेला होता. तेथे त्यांनी बिर्याणी ऑर्डर केली. मात्र त्यासोबत जे दही आलं ते या इसमाला कमी वाटलं, म्हणूनच त्याने रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांकडे आणखी दह्याची मागणी केली. बास… एवढंच कारण पुरलं आणि रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी त्या ग्राहाकाला थेट मारहाण करण्यासच सुरूवात केली. या घटनेबद्दल कोणीतरी पोलिसांना कळवले असतात, ते तातडीने तेथे दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही पक्षांना पोलिस स्थानकांत नेलं व त्यांची बाजू ऐकण्यास सुरूवात केली. मात्र तेवढ्यात मारहाण झालेला इसम पोलिस स्थानकातच खाली कोसळला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिस स्थानकांतच झाल्या उलट्या आणि खेळ संपला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये दही मागितल्यानंतर ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात वाद झाला आणि तो वाढू लागला. त्यानंतर दोन्ही समूहात मारहाणही सुरू झाली. तेवढ्यात पोलिस तेथे पोहोचले आणि ग्राहक व कर्मचारी दोघांनाही पोलिस स्थानकांत नेले. तेथ तक्रार दाखल करण्यात आली. झालेल्या मारहाणीत त्या ग्राहकाल फारसे लागले नव्हते, पण पोलिस स्टेशनमध्येच त्याला उलट्या होऊ लागल्या व तो खाली कोसळला. तेव्हा त्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सध्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.