लिफ्टमध्ये कुत्रा नेण्यावरून पुन्हा वाद, निवृत्त अधिकारी आणि महिलेमध्ये थेट हाणामारीच; व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Nov 01, 2023 | 2:10 PM

सोसायटीमध्ये कुत्र्यावरून पुन्हा वाद पेटला. एका पॉश सोसायटीच्या लिफ्टमध्ये कुत्रा नेण्याच्या मुद्यावरून एक जोडपं आणि निवृत्त अधिकारी यांच्यात भांडण झालं. मात्र तो एवढा वाढला की प्रकरण ते हाणामारीपर्यंत पोहोचलं.

लिफ्टमध्ये कुत्रा नेण्यावरून पुन्हा वाद, निवृत्त अधिकारी आणि महिलेमध्ये थेट हाणामारीच; व्हिडीओ व्हायरल
Image Credit source: social media
Follow us on

नॉएडा | 1 नोव्हेंबर 2023 : उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये पुन्हा एकदा कुत्र्यावरून गोंधळ माजला आहे. येथील एक पॉश सोसायटीत लिफ्टत्या आतमध्ये कुत्रा नेण्यावरून एक जोडपं आणि निवृत्त अधिकाऱ्यादरम्यान वाद झाला. पण तो वाद इतका विकोपाला गेला की ते प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. रागाच्या भरात निवृत्त IAS अधिकाऱ्याने त्या महिलेला थप्पड मारली.मात्र त्यानंतर तिचा पतीही मध्ये पडला आणि ते जोडपं आणि तो अधिकारी या दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. महिलेच्या पतीनेही त्या अधिकाऱ्याला मारहाण केली. अखेर काही वेळाने प्रकरण शांत झाले आणि वाद थांबला. या सर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ती महिला आणि निवृत्त अधिकारी या दोघांमध्येही मारामारी होत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तेवढ्यात महिलेचा पतीदेखील तिकडे येतो आणि तोही त्या निवृत्त अधिकाऱ्याशी वाद घालू लागतो. ही संपूर्ण घटा सेक्टर- 108 मधील पार्क्स लॉरिएट सोसायटीमधील आहे.

कुत्र्याला लिफ्टमध्ये न्यायची होती महिलेची इच्छा

रिपोर्ट्सनुसार, ती महिला, (तिच्या कुत्र्याला) लिफ्टमधून नेणार होती. मात्र निवृत्त अधिकाऱ्याने याला विरोध दर्शवला. कुत्र्याला लिफ्टमध्ये नेऊ नकोस, असे ते त्या महिलेला सांगत होते. याच मुद्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला जो विकोपाला गेला आणि त्याचे हाणामारीत रुपांतर झाले. त्या वादादरम्यान निवृ्त्त अधिकाऱ्याने त्यांचा मोबाईल काढला, पम त्या महिलेने तो हिसकावून घेतला. मात्र त्यामुळे त्यांचा वाद आणखीनच वाढला.

भांडणामुळे बरेच लोक तिथे जमा झाले. तेवढ्यात त्या महिलेचा पतीही तिथे आला आणि त्याने निवृत्त अधिकाऱ्याला थप्पड मारली. हा सर्व गोंधळ सुरू असतानाच कोणीतरी पोलिसांना कळवलं. सेक्टर- ३९ चे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. त्यामध्ये दोघेही एकमेकांशी वाद घालताना आणि मारामारी करताना आढलले. रिपोर्टनुसार, दोन्ही पक्षांपैकी कोणीच याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली नसून आपापसांतच हा वाद मिटवला.