नेहमीप्रमाणे शेतात फेरफटका मारण्यास गेले ते परतलेच नाही, मग थेट मृतदेह विहिरीत आढळला, काय घडलं नेमकं?
पोलीस खात्यातून निवृत्त झाल्यानंतर नेहमीप्रमाणे ते शेतात फेरफटका मारण्यास गेले होते. मात्र घऱी परतलेच नाही. पत्नी आणि पुतण्या पाहण्यासाठी गेले असता भलतंच समोर आलं.
पुणे : निवत्त पोलिसाला मारहाण करत त्यांची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याची खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील मंचर येथे घडली आहे. पंढरीनाथ थोरात असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मुलगा संदिप थोरात यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या घटनेचा तपास करुन खुनातील आरोपीस मंचर पोलीसांनी 24 तासाच्या आत अटक केली आहे. मच्छिंद्र पांडुरंग गुंजाळ असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
नेहमीप्रमाणे शेतावर फेरफटका मारायला गेले
पंढरीनाथ थोरात हे पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होते. 2003 त्यांनी निवृत्ती घेतली आणि ते पत्नी आणि मुलांसह गावी म्हणजेच पुणे जिल्ह्यातील मंचर या ठिकाणी राहून शेती करत होते. थोरात हे रोज शेतात फेरफटका मारण्यासाठी जात, मात्र शेतात गेल्यानंतर रोज दुपारच्या दरम्यान जेवणासाठी ते घरी येत असत. मात्र काल दुपारी ते घरी न आल्याने त्यांची पत्नी शांताबाई यांनी मुलगा संदीपला फोन करून वडील घरी आले नसल्याचे फोन वरून सांगितले. मात्र संदीप बाहेर असल्याने त्यांनी त्यांचा चुलत भाऊ शिवाजी थोरात याला वडिलांचा शोध घेण्यास सांगितले. यावेळी शिवाजी थोरात आणि शांताबाई थोरात यांनी शेतामध्ये त्यांचा शोध घेतला असता त्यांच्या शेतातील विहिरीतच त्यांचा मृतदेह आढळून आला.
उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणातून हत्या
या गुन्ह्यातील आरोपी हा खून करून पळून गेला होता. या आरोपीचा शोध घेण्यासाठी मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश होडगर यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेराव यांनी एक पथक तयार करून घटनास्थळाचा पंचनामा केला. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे मृताने अनेक लोकांना उसने पैसे दिले होते, ते पैसे मागण्यासाठी गेले असता संबंधित लोक त्यांना दमदाटी करत असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले होते. पोलिसांनी याच दिशेने तपास करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. याप्रकरणी मच्छिंद्र पांडुरंग गुंजाळ राहणार मंचर याचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. आरोपीची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
निवत्त पोलिसाला मारहाण करत त्यांची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याची खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील मंचर येथे घडली आहे. पंढरीनाथ थोरात असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मुलगा संदिप थोरात यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या घटनेचा तपास करुन खुनातील आरोपीस मंचर पोलीसांनी 24 तासाच्या आत अटक केली आहे. मच्छिंद्र पांडुरंग गुंजाळ असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.