‘कुणी कुणाला मारहाण केली हेचं कळेना’, पाहणारे रिक्षा चालक सुध्दा…
NALASOPARA CRIME STORY : नालासोपाारा परिसरात दोन रिक्षा चालकांच्या गटात तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती मिळाली आहे. परंतु कुणी कुणाला मारहाण केली हेचं कळेना अशी सगळीकडं चर्चा सुरु आहे.
नालासोपारा : नालासोपा-यात (NALASOPARA CRIME STORY) रिक्षाचालकांच्या (RICKSHAW STAND) दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. ही मारामारी पूर्व प्रगतीनगर येथे आज सकाळी झाली आहे. पूर्व प्रगती नगर ते विरार चालणाऱ्या रिक्षांचा तिथं स्टँड आहे. त्याचं रिक्षा स्टॅन्डवर रिक्षा लावण्यावरून दोन गटाच्या रिक्षा चालकात प्रथम वाद विवाद झाला. काही वेळाने या वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. भाजपा आणि काँग्रेसच्या (BJP CONGRESS) दोन रिक्षा युनियन मधील स्टॅन्ड वरून प्रथम बाचाबाची आणि नंतर तुफान हाणामारी झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हाणामारी एवढ्या जोरात झाली की कोण कुणाला मारत आहे हेही समजत अशी सगळीकडं चर्चा सुरु आहे.
रिक्षा चालकांची तिथं रिक्षा लावणाऱ्या वरुन मोठा वाद झाला. तो वाद इतका मोठा झाला की, ते भांडण पाहणारे सुध्दा कंन्फुज झाले अशी माहिती मिळाली आहे. हे प्रकरण आता पोलिसांच्याकडे गेले असून चौकशी सुरु असल्याची माहिती समजली आहे. त्याचबरोबर काही रिक्षा चालकांना मार सुध्दा लागला आहे. रिक्षा चालक हे नालासोपारा परिसरातील आहेत. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर खरं कारण बाहेर येईल.
कल्याणमध्ये पती पत्नीला मारहाण
कल्याण कोळसेवाडी परिसरात दुचाकीवरुन आपल्या पतीसोबत चाललेल्या एका महिलेला शिवीगाळ करत तिच्या पती सह दोन इसमांना 10 ते 15 जणांच्या टोळक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. मात्र सतत घडणाऱ्या या घटनांवरुन पोलीस अकार्यक्षम झाल्याचे दिसून येते. वाढती गुन्हेगारी रोखण्यास पोलीस अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.