दक्षिण मुंबईत रिक्षाला बंदी असताना छत्रपती शिवाजी टर्मिनससमोर फिरवली रिक्षा
एका रिक्षाचालकाने आपली रिक्षा थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरच थांबवल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर सोमवारपासून फिरायला लागला आणि खळबळ उडाली, या व्हीडीओनंतर चर्चेला चांगलेच पेवच फुटले.
मुंबई : दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात एक ऑटो रिक्षावाला ( auto rickshaw ) बिनधास्त त्याची रिक्षा फिरवत असल्याचा ( VIDEO ) व्हिडीओ समाजमाध्यमावर सोमवारवारपासून फिरत असल्याने खळबळ उडाली आहे. तीन चाकी ऑटो रिक्षांना केवळ उपनगरातच वाहतूकीची परवानगी आहे. तरीही अशा पद्धतीने थेट फोर्ट सीएसएमटी ( CSMT ) इमारती समोरच वाहतूक पोलिसांच्या नाकाखाली अशा प्रकारे एका रिक्षाचालकाने वाहतूक नियमांची ऐसी तैशी केल्याने हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, या घटनेत जागे झालेल्या पोलिसांनी रिक्षाचालकाला शोधून गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी दक्षिण मुंबईतील फोर्टच्या सीएमएसटी इमारतीच्या समोर एका रिक्षाचालकाने आपली रिक्षा थांबवल्याचा व्हिडीओ एकाने ट्वीटरवर व्हायरल केला. त्यानंतर सोशल मिडीयावर या व्हीडीओ चर्चेला पेवच फुटले. मदनचिकना नावाच्या युजरने हा व्हिडीयो ट्वीटरवर पोस्ट केला आहे. त्याने त्या पोस्टवर ऑटो रिक्षा बीएमएसी हेक्वॉर्टर जवळ फिरत आहे अशी कॅप्शन टाकत त्या पोस्टला मुंबई पोलीस आणि मुंबई वाहतूक पोलीसांना टॅग केले आहे. या पोस्टवर काही जणांनी रिक्षा चालकाला दोषी म्हटले आहे. तर काही जणाने त्याची बाजू घेतली आहे. यासंदर्भात हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सांगितले की संबंधित रिक्षाचालकावर बेफाम आणि हलगर्जीने वाहन चालवून सार्वजनिक शांतता भंग केल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दक्षिण मुंबईत रिक्षाला का आहे बंदी
दक्षिण मु्ंबईत आपल्याला रिक्षा का दिसत नाहीत. याबद्दल मुंबईकरांना उत्सुकता आहे. परंतू तीन चाकी मीटर ऑटो रिक्षांना पश्चिम उपनगरात केवळ वांद्रे पर्यंत परवानगी दिली आहे. तर पूर्व उपनगरात सायन शीव पर्यंतच रिक्षा चालवण्यास नियमानूसार परवानगी दिले आहे. उपनगराशिवाय दक्षिण मुंबईत कुठेच कशी काय रिक्षा दिसत नसल्याने याचा अनेकांना अचंबा वाटत आहे. यावर समाजमाध्यमावर काही जणांनी म्हटले आहे जास्त ट्रॅफिक असल्याने रिक्षांना आवरणे कठीण जात असल्याने त्यांच्यावर बंदी आहे. तर काही जण म्हणत आहेत, राजकीय कारणाने रिक्षांना दक्षिण मुंबईत बंदी आहे, परंतू नेमके कारण काय असे तुम्हाला वाटत असे तर ते पाहुया…
Abey yeh Auto CSMT kaise aagayi ?? https://t.co/OzmNfot8cO
— Godman Chikna (@Madan_Chikna) February 13, 2023
हे आहे लॉजिकल कारण
दक्षिण मुंबईत रिक्षांना बंदी असण्यामागे लॉजिकल कारण सांगितले जात आहे ते असे आहे… दक्षिण मुंबईतील रस्ते उपनगराप्रमाणे रुंद नाहीत. तसेच येथील रस्ते वळणदार असल्याने गर्दीत रिक्षांसारख्या तीन चाकी वाहनांवर पोलीसांना नियंत्रण ठेवताना त्रास होईल म्हणून त्यामुळे ऑटोंना दक्षिण मुंबईत वाहतूक विभागाने बंदी घातलेली आहे.