जनगणनेच्या बहाण्याने घरात घुसले अन् चाकूच्या धाकाने… अमरावती हादरलं

एक घटना धक्कादाक अमरावतीमधून समोर आली आहे. अमरावतीमध्ये नायब तहसीलदाराच्या पत्नीला दिवसाढवळ्या लुटण्यात आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे जनगणनेचं काम करत असल्याचा बहाणा करून हे लुटारू आले.

जनगणनेच्या बहाण्याने घरात घुसले अन् चाकूच्या धाकाने... अमरावती हादरलं
Follow us
| Updated on: Jan 31, 2024 | 10:02 AM

अमरावती | 31 जानेवारी 2024 : सध्या राज्यभरात चोरी, लुटमार, दरोडा यांसारख्या घटना वाढत आहेत. दिवसभरात अनेक वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या, चोरीच्या, दरोड्याच्या घटना समोर येत असतात. त्यातच आता आणखी एक घटना धक्कादाक अमरावतीमधून समोर आली आहे. अमरावतीमध्ये नायब तहसीलदाराच्या पत्नीला दिवसाढवळ्या लुटण्यात आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे जनगणनेचं काम करत असल्याचा बहाणा करून हे लुटारू आले आणि घरात घुसून चाकूचा धाक दाखवत त्यांनी सोनं-चांदीचे दागिने, कॅश यासह ५ लाखांचा मुद्देमाल लुटून फरार झाले. दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीमुळे एकच खळबळ माजली असून ते दोन्ही लुटारू सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत.

अमरावती शहरातील राठी नगर परिसरात भरदिवसा दोन दरोडेखोरांनी नायब तहसीलदारांच्या घरात चाकूचा धाक दाखवून लूट केली. घरात एकट्या राहणाऱ्या महिलेला धमकावून चोरट्यांनी रोख रक्कमसेह लाखोंचे दागिने घेऊन पळ काढला. सरकार आणि प्रशासनाच्या वतीने जनगणना सुरू झाल्याचे सांगून हे दोन्ही बदमाश घरात घुसले होते. याबाबत माहिती गोळा करण्यासाठी आलो आहोत अशी बतावणी त्यांनी केली . ही महिला घरात एकटी असल्याचे पाहून ते घरात घुसले आणि तिला तिचे, तसेच इतर लोकांचे नाव विचारले. त्यानंतर त्यानी तिच्याकडे पाणी मागितले. महिला पाणी आणण्यासाठी आत गेली असता, संधीचा फायदा घेत दोन्ही चोरट्यांनी महिलेच्या मानेवर धारदार चाकू ठेवला.

महिलेला दिली धमकी

राठी नगर परिसरात नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या पत्नी घरात एकट्याच होत्या. तेव्हा दोघे जण जनगणनेचं काम करण्याच्या बहाण्याने आले. नाव, माहिती विचारू लागले. नंतर त्यांनी महिलेकडे पिण्यास पाणी मागितले आणि ती एकटी असल्याचे पाहून तिच्या मानेवर चाकू ठेवत धमकी दिली. घरात जेवढी कॅश, सोन-चांदीचे दागिने असतील ते काढून दे. तसं केलं नाही तर हा चाकू तुमच्या मानेवर चालवू असेही त्यांना धमकावले. घाबरलेल्या महिलेने सोन्याचे दागिने, तसेच कॅश यासह 5 लाखांचा मुद्देमाल चोरांच्या हवाली केला. त्यानंतर त्या लुटारूंनी धक्का देऊन महिलेला खाली पाडले आणि ते तेथून फरार झाले. महिलेने प्रसंगावधान राखत आरडा-ओरडा केला, तिचा आवाज ऐकून शेजारचे धावत आले असता, त्या महिलेने सर्व प्रकार कथन केला.

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक

त्या महिलेला धक्का देऊन घराबाहेर पळून जाताना ते दोन्ही चोरटे तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. सरकारी अधिकाऱ्याच्या घरात अशी घटना घडणे ही पोलिस व प्रशासनासाठी गंभीर बाब आहे. याप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.