नागपुरात माजी सैनिकाच्या घरी दरोडा, रोख रकमेसह पिस्टल लंपास केल्यानं खळबळ

पुरुषोत्तम ले-आउट येथे राहणाऱ्या माजी सैनिकाच्या घरी पाच ते सहा अज्ञात आरोपींनी दरोडा टाकला. Robbery at Ex-serviceman house

नागपुरात माजी सैनिकाच्या घरी दरोडा, रोख रकमेसह पिस्टल लंपास केल्यानं खळबळ
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 6:58 PM

नागपूर: जिल्ह्यातील कामठी पोलीस स्टेशन हद्दीत रणाळा परिसरातील पुरुषोत्तम ले-आउट येथे राहणाऱ्या माजी सैनिकाच्या घरी पाच ते सहा अज्ञात आरोपींनी दरोडा टाकला. या घटनेमुळे संपूर्ण कामठी परिसरात खळबळ माजलीय. आरोपींनी माजी सैनिकाची पिस्टल लंपास केल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे. (Robbery at Ex-serviceman house in Nagpur)

पाच ते सहा दरोडेखोरांनी माजी सैनिक सुनील डेविड यांच्या घराच्या दाराची कडी तोडून घरात प्रवेश मिळावला. दरोडेखोरांनी त्यानंतर समोरच्या खोलीत झोपलेल्या सुनील डेव्हिड दोन मुलांना बंधक बनवले. यामुळे डेविड हे दरोडेखोरांचा प्रतिकार करू शकले नाहीत. या संधीचा गैरफायदा घेऊन आरोपींनी डेविड यांच्या पत्नीच्या पर्स मध्ये ठेवलेले दहा हजार रुपये,सोन्याची अंगठी आणि कपाटात सुरक्षित असलेली पिस्टल लंपास केली. आरोपींनी लंपास केलेल्या पिस्टलचा परवाना सुनील डेविड यांच्याकडे उपलब्ध असून त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी ती पिस्टल घेतली होती. आरोपींनी मिळेल ते लुटल्यानंतर त्यांच्या घरातून पळ काढला आहे. सुदैवाने आरोपींनी डेविड यांच्या मुलांना कोणतीही दुखापत केली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. (Robbery at Ex-serviceman house in Nagpur)

सुनील डेव्हिड यांच्या घरी दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोरांनी त्याच परिसरात राहणाऱ्या दुसऱ्या घराकडे मोर्चा वळवला. मात्र, माजी सैनिक शरद सहारे यांच्या घरात दरोडेखोरांनी प्रवेश केला होता. मात्र, माजी सैनिक सहारे हे कामानिमित्त कुटूंबासह बाहेरगावी गेले असल्याने आरोपींच्या हाती फार काही लागले नाही. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

घटनेची माहिती समजताच नवीन कामठी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर परिसरात चांगलीच खळबळ माजली असून देशाचे रक्षण करणारे माजी सैनिक सुद्धा सुरक्षित नसल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसून येत आहे. (Robbery at Ex-serviceman house in Nagpur)

उपराजधानी नागपूर गुन्हेगारीची राजधानी?

राज्याची उपराजधानी नागपूर सध्या गुन्हेगारीची राजधानी झालीय का असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न निर्माण होण्याला कारण देखील तसच आहे. गुन्हेगारांवरील पोलिसांची सैल झालेली पकड, हे सगळं असलं तरी घरफोडी, चैन स्नॅचिंग सारख्या घटना कमी झाल्याचा दावा पोलीस करत आहेत. मात्र, घटनांमध्ये वाढ झालेली दिसते.

गेल्या 6 वर्षात नागपूर गृहमंत्र्यांचं शहर म्हणूंन ओळखलं जातं आहे. गेल्या सरकर मधील मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तर ठाकरे सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख देखील नागपूरकर आहेत. मात्र, नागपूर हत्येच्या गुन्ह्यांबाबतीत नागपूर देशातील अग्रेसर शहर ठरतेय. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि पोलिसांचा गुन्हेगारांवर कमी पडत असलेला दबाव यासाठी कारणीभूत ठरतोय का?, असा प्रश्न निर्माण झालाय.

संबंधित बातम्या:

रेखा जरे हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठेला मोठा धक्का; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

हर्षवर्धन जाधवांना 2 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलांचा दानवेंवर आरोप!

(Robbery at Ex-serviceman house in Nagpur)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.