Nashik Crime : ऐन दिवाळीत (Diwali) दरोडेखोर सक्रिय झाले आहे. नाशिकच्या घोटी (Nashik Ghoti) परिसरात मागील आठवड्यात दोन घरावर दरोडा (Robbery) टाकून लाखों रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला होता. ही घटना ताजी असतांना आणि दरोडेखोरांचा शोध लागलेला नसतांना नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे गावात मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. ऐन दिवाळीत ही दरोडयाची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दरोडे खोरांचा पोलीसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहे. सिन्नर तालुक्यात ही घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून ग्रामीण पोलिसांसामोरे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
नाशिक पुणे मार्गावर राहत असलेल्या सुभाष कराड हे नुकतेच रविवारी सायंकाळी मुंबई येथून गावी आलेले होते.
त्याच दिवशी दरोडेखोरांनी रात्री कराड यांच्या घरी दरोडा टाकला. सेफ्टी डोअर असल्याने त्यांनी खिडकीतून यातमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
मात्र याच वेळी कराड यांच्या घरातील दोन्ही मुले अभ्यास करत होती त्यामुळे दरोडे खोरांनी काढता पाय घेतला.
याच वेळी बाजूला असलेल्या मेंढपाळ यांनी ही घटना पाहिली मात्र मुंबईहून आलेले कराड यांची दिवाळीची लगबग सुरू असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले.
कराड यांच्या ही बाब ;लक्षात आल्यावर त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना अलर्ट केले, मात्र दरोडेखोर यांनी जवळच असलेल्या शेळके मळ्यात दरोडेखोरांना टाकण्याचा प्रयत्न केला.
शेळके यांच्या घराबाहेर मात्र झोपलेल्या व्यक्तीचा मोबाइल आणि बॅटरी घेऊन दरोडेखोर यांनी पोबारा केला.
दरोडेखोरांनी तेथून पोबारा करत आपला मोर्चा जवळच असणाऱ्या संतोष गंगाधर कांगणे यांच्या घराकडे वळवला. दरवाजांच्या कड्या तोडून आत प्रवेश करत सामानाची उलथापालथ केली.
संतोष कांगणे यांच्या आई रत्नाबाई यांच्या मानेला चाकू लावत त्यांनी दागिने काढून घेतले नंतर त्यांच्याच घरातील व्यक्तींना मारहाण देखील केली.
कांगणे यांनी त्यांच्याकडील साडेतीन लाख रुपये रोख रक्कम आणि दहा तोळे दागिने काढून दिल्याचे सांगितले. दरोडेखोरांनी इंदुबाई शेळके यांच्या कानातील सोन्याची टाप्से ,गळ्यातील दागिने काढून घेतले आहे.
एकूणच दोन ठिकाणी झालेल्या दरोडयाच्या घटणेने पोलीसांसमोरील चिंता वाढली आहे, या घटणेमुळे नगरिकांसमोरील चिंता वाढली आहे.