मुलं चोरणारी टोळी आली, अफवा पसरली अन् एकच गोंधळ; व्हिडिओतील तरुण नेमका कोण ?

| Updated on: Sep 21, 2022 | 12:21 AM

व्हायरल झालेला व्हिडिओ मुलं चोरणाऱ्या टोळीतील सदस्याचा नसून, एका महिलेची छेड काढणाऱ्या आरोपीचा आहे.

मुलं चोरणारी टोळी आली, अफवा पसरली अन् एकच गोंधळ; व्हिडिओतील तरुण नेमका कोण ?
वसई-विरारमध्ये मुलं चोरणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा
Image Credit source: TV9
Follow us on

वसई / विजय गायकवाड (प्रतिनिधी) : विरारमध्ये लहान मुलांना चोरी सक्रिय झाल्याची अफवा मोठ्या प्रमाणात पसरली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मुलं चोरणाऱ्या टोळीतील एका आरोपीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral)) झाला होता. या व्हिडिओमध्ये मुलं चोरणारा चोराला झाडाला बांधून ठेवलेले दिसत आहे. मात्र हा व्हिडिओ व्हायरल करत मुलं चोरणारी टोळी (Kid stealing gang) आल्याची बातमी केवळ अफवा (rumor) असल्याचे निष्पन्न झाले आहे.

वसईतील नवघर परिसरातील व्हिडिओ

व्हायरल झालेला व्हिडिओ मुलं चोरणाऱ्या टोळीतील सदस्याचा नसून, एका महिलेची छेड काढणाऱ्या आरोपीचा आहे. जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो वसई पूर्व नवघर परिसरातील 17 सप्टेंबर रोजीचा आहे.

व्हिडिओतील तरुण छेडछाड प्रकरणातील आरोपी

मारहाण झालेला तरुण हा मागच्या 15 दिवसापासून महिलेचा पाठलाग करायचा. सोसायटी परिसरात फिरत विवाहित महिलेला हातवारे करत मानसिक त्रास देत होता.

हे सुद्धा वाचा

महिलेने आपल्या पतीला ही घटना सांगितल्यानंतर पतीने आपल्या मित्राना सांगून त्याला पकडून झाडाला बांधून ठेवले. याबाबत पोलिसांना माहिती देत आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

माणिकपूर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल

महिलेच्या तक्रारीवरून माणिकपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केले आहे.

मुलं चोरणाऱ्या टोळीची अफवा

वसईत विवाहित महिलेचा पाठलाग करून अश्लील हावभाव करणाऱ्या तरुणाला पकडून झाडाला बांधून ठेवण्यात आले होते. झाडाला बांधलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

व्हायरल झालेल्या व्हिडिओ वरून मुलं पळवणारी टोळी वसई, विरारमध्ये सक्रिय झाली आहे. झाडाला बांधलेला व्हिडीओ हा त्याच टोळीचा सदस्य असल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पण व्हायरल होणारा व्हिडीओ हा मुलं पळवणाऱ्या टोळीच्या तरुणांचा नसून, एका महिलेची छेडछाड काढणाऱ्या आरोपीचा आहे. त्यामुळे कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवून, कोणतेही गैरकायदेशीर कृत्य करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.