बुलेरोने बुलेटला २० फूट फरफटत नेले; त्यानंतर घडली ही भयानक घटना
एक तरुण बुलेटने जात होता. त्याचा पाठलाग करत बुलेरोवर बसून काही जण आले. त्यांनी बुलेटला धडक दिली. तेवढ्यावरच ते थांबले नाही.
जळगाव : जिल्ह्यातील अंतुर्ली येथे धक्कादायक घटना घडली. एक तरुण बुलेटने जात होता. त्याचा पाठलाग करत बुलेरोवर बसून काही जण आले. त्यांनी बुलेटला धडक दिली. तेवढ्यावरच ते थांबले नाही. त्यानंतर त्यांनी बुलेटला फरफटत नेले. एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे ही घटना घडली. त्यामुळे तिथं काय सुरू आहे, हे कुणाला कळलेच नाही. पण, त्यानंतर हल्लेखोरांनी शस्त्र काढले. त्या तरुणावर सपासप वार केले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले.
सचिनवर शस्त्राने वार
अंतुर्लीतील हा तरुण आहे सचिन पाटील. ही घटना भातखंडे गावाजवळ घडली. सचिन बुलेटने जात होता. तेवढ्यात हल्लेखोर बुलेरो गाडीने आले. त्यांनी सचिनच्या बुलेटला धडक दिली. त्यानंतर बुलेटला फरफटत नेले. यात सचिन जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोर गाडीतून उतरले. त्यांनी सचिनवर शस्त्राने वार केले. यात सचिनचा मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.
बुलेटला बुलेरोने फरफटत नेले
पाचोरा तालुक्यातल्या अंतुर्ली येथील सचिन पाटील या तरुणाची भातखंडे गावानजीक हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तरुणाच्या बुलेटला हल्लेखोरांनी बुलेरो गाडीने धडक दिली. 15 ते 20 फूटपर्यंत फरफटत नेले. त्यानंतर तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. हल्लेखोरांनी तरुणाची हत्या केली.
हल्लेखोर अज्ञात असल्याची माहिती
जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध कासोदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलेटला बुलेरोने धडक मारून फरफटत नेले. धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. याविषयी पुढील पाचोरा पोलीस तपास करीत आहेत.
कोण आहे हल्लेखोर
हल्लेखोर कोण आहेत. कोणत्या कारणासाठी त्यांनी सचिनचा जीव घेतला. हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल. पण, ज्या पद्धतीने त्यांनी सचिनला संपवले ते सर्व पाहून थरकाप उडतो. काहीतरी दुश्मनी असल्याशिवाय अशाप्रकारे कुणी क्रूरपणे मारणार नाही, असे एकंदरित दिसते. पोलिसांच्या तपासानंतर आरोपी सापडतात की नाही, हे समजेल.