VIDEO | NIA ने जप्त केलेल्या स्पोर्ट्स बाईकवर सचिन वाझेंची स्वारी, चार वर्ष जुना व्हिडीओ समोर

दमणमधून ही स्पोर्ट्स बाईक एनआयएने जप्त केली. ही बाईक मीना जॉर्ज यांच्या नावावर आहे. (Sachin Vaze Video Sports Bike)

VIDEO | NIA ने जप्त केलेल्या स्पोर्ट्स बाईकवर सचिन वाझेंची स्वारी, चार वर्ष जुना व्हिडीओ समोर
सचिन वाझे यांचा ती बाईक चालवतानाचा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 1:33 PM

मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित सचिन वाझे (Sachin Waze) यांचा चार वर्ष जुना व्हिडीओ यूट्यूबवर पाहायला मिळत आहे. एनआयएने नुकतीच जप्त केलेली स्पोर्ट्स बाईक वाझे चालवत होते, असे या जुन्या व्हिडीओत दिसत आहे. त्यामुळे वाझेंचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हं आहेत. (Sachin Vaze old YouTube Video riding Sports Bike detained by NIA reveals)

दमणमधून ही स्पोर्ट्स बाईक एनआयएने जप्त केली. ही बाईक मीना जॉर्ज यांच्या नावावर आहे. ही स्पोर्ट्स बाईक बेनेली कंपनीची आहे. तिची किंमत जवळपास 7 लाख 16 हजार रुपयांच्या घरात आहे. काही दिवसांपूर्वी एनआयएने मीना जॉर्ज यांना ताब्यात घेतले होते. ट्रायडंट हॉटेलच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये मीना जॉर्ज सचिन वाझे यांच्यासोबत दिसून आल्याचे सांगितले जाते. त्यावेळी त्यांच्या हातात पैसे मोजण्याचे मशीन होते, असेही सांगितले जाते.

टेम्पोमधून काल सकाळी ही बाईक एनआयएच्या कार्यालयात आणण्यात आली. NIA च्या पथकांनी आतापर्यंत एकूण नऊ वाहने जप्त केली आहे. यामध्ये आठ चारचाकी गाड्या आणि एका बाईकचा समावेश आहे. या वाहनांचा उपयोग वाझे किंवा वाझेंच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आल्याचा ‘एनआयए’चा संशय आहे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, सचिन वाझे (Sachin Waze) यांचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळण्याच्या आदल्या दिवशी वाझे सीएसएमटी रेल्वे स्टेशनकडे जाताना या व्हिडीओत दिसत आहेत. 4 मार्च 2021 रोजी संध्याकाळी 7 वाजून 1 मिनिटांचा हा सीसीटीव्ही व्हिडीओ आहे. पाच मार्चला मनसुख यांचा मृतदेह कळवा रेतीबंदर परिसरात सापडला होता. वाझे संध्याकाळी सातच्या सुमारास सीएसएमटीवरुन लोकल ट्रेन पकडून ठाणे स्टेशनला गेल्याची माहिती आहे.

सचिन वाझेंसह नाट्य रुपांतरण

दरम्यान, सचिन वाझे यांना घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) अधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबईतील लोकल ट्रेनने (Local Train) प्रवास केला. 4 मार्च रोजीच्या घटनांचे नाट्य रुपांतरण करण्यासाठी सचिन वाझे यांना छत्रपती शिवाजी महाराज (CSMT) आणि कळवा रेल्वे स्थानकात नेण्यात आले होते. (Sachin Vaze old YouTube Video riding Sports Bike detained by NIA reveals)

रात्री साधारण सव्वाअकराच्या सुमारास NIA चे अधिकारी वाझे यांना घेऊन मुंबईतील कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर साडेअकरा वाजता हे सर्वजण सीएसएमटी स्थानकात दाखल झाले. याठिकाणी फलाट क्रमांक 4 आणि 5 वर सचिन वाझे यांना नेऊन 4 मार्चच्या रात्री काय घडले होते, याची नेमकी माहिती ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.

संबंधित बातम्या –

सचिन वाझेंना घेऊन NIA टीमचा लोकल ट्रेनने प्रवास; CSMT आणि कळवा स्थानकात क्राईम सीन रिक्रिएट

कार संपल्या, वाझे प्रकरणात आता स्पोर्टस बाईकची एन्ट्री; ‘ती’ दुचाकी NIAच्या ताब्यात

(Sachin Vaze old YouTube Video riding Sports Bike detained by NIA reveals)

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.