आफताबच्या नार्को टेस्टला न्यायालयाची परवानगी, ‘या’ प्रश्नांची उत्तरे मिळवणार पोलीस

| Updated on: Nov 18, 2022 | 5:27 PM

पोलिसांच्या मागणीला साकेत न्यायालयाने परवानगी दिली आहे. आफताबने जरी गुन्ह्याची कबुली दिली असली पोलिसांच्या हाती अद्याप भक्कम पुरावे नाहीत. नार्को टेस्टद्वारे पोलीस काही प्रश्नांची उकल करणार आहेत.

आफताबच्या नार्को टेस्टला न्यायालयाची परवानगी, या प्रश्नांची उत्तरे मिळवणार पोलीस
आफताब;ची आजच नार्को टेस्ट?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी आणि तिचा लिव्ह इन पार्टरन आफताब पुनावाला याने पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र चौकशीदरम्यान, आफताब पोलिसांची दिशाभूल करत आहे, तो सतत आपला जबाब बदलत आहे. आफताबने न्यायालयातही आपला जबाब बदलला तर केस कमजोर होईल. यासाठी पोलिसांनी त्याची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. पोलिसांच्या मागणीला साकेत न्यायालयाने परवानगी दिली आहे. आफताबने जरी गुन्ह्याची कबुली दिली असली पोलिसांच्या हाती अद्याप भक्कम पुरावे नाहीत. नार्को टेस्टद्वारे पोलीस काही प्रश्नांची उकल करणार आहेत.

नार्को टेस्टदरम्यान काय प्रश्न विचारणार पोलीस?

पोलीस पहिल्यापासून क्रमवार संपूर्ण घटना जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. नार्को टेस्टच्या माध्यमातून पोलीस श्रद्धा आणि आफताबशी संबंधित प्रत्येक प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

आफताबने श्रद्धाला का मारलं? काय होतं दोघांमध्ये भांडण? याआधी आफताबने कधी खुनाची योजना आखली होती का? ही हत्या पूर्णपणे नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली होती का? या घटनेत आफताबसोबत आणखी कोणाचा सहभाग होता का?

हे सुद्धा वाचा

आफताबने श्रद्धाची हत्या कशी केली? आफताबने ज्या करवतीने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले ती कुठे फेकली? श्रद्धाचे डोके कुठे आहे? श्रद्धाचे मृतदेहाचे बाकीचे तुकडे कुठे आहेत? श्रद्धाचे कपडे कुठे आहेत? श्रद्धाचा मोबाईल कुठे आहे? ही सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत.

अद्याप मृतदेहाचे डोके आणि इतर तुकडे सापडले नाहीत

पोलिसांना अद्याप श्रद्धाचे कपडे, तिचा मोबाईल, हत्येत वापरलेलं हत्यार, तिचं डोकं आणि शरीराचे इतर भाग सापडले नाहीत. श्रद्धा हत्याकांडात काही हाडे वगळता पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही. पोलिसांना आतापर्यंत मृतदेहाचे 13 तुकडे मिळाले असून ते चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

पोलिसांनी डीएनए चाचणीसाठी वडिलांचे नमुनेही घेतले आहेत. तसेच आफताबने हत्या केल्यानंतर श्रद्धाचे कपडे ज्या गार्बेज व्हॅनमध्ये फेकून दिले त्या गार्बेज व्हॅनचीही ओळख पटली आहे. कचरा व्हॅन ज्या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी जाते, त्या ठिकाणचीही पोलीस तपासणी करणार आहेत.

पोलिसांनी जंगलात बंदोबस्त ठेवला आहे. या जंगलात अनेक महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता पोलिसांना वाटते. अशा परिस्थितीत नार्को चाचणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

829985