Salman Khan : सलमानच्या हत्येसाठी 25 लाखांची सुपारी? पाकिस्तान कनेक्शन; पोलिसांच्या आरोपपत्रात काय म्हटलंय ?
फेब्रुवारी महिन्यात सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊसवर इतरांसह रेकी केल्याच्या आरोपावरून नवी मुंबई पोलिसांनी गुरुवारी हरियाणातील सुखबीर बलबीर सिंग उर्फ सुखा याला अटक केली.
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची लॉरेन्स बिश्नोई गँगने केल्यानंतर मोठी खळबळ माजली. अभिनेता सलमान खानशी जवळकीमुळे त्यांना टार्गेट केल्याचा अंदाज आहे. दरम्यान या घटनेनंतर सलमान खानच्या सुरक्षेतही मोठी वाढ करण्यातलआली. एप्रिल महिन्यात बिश्नोी गँगच्या शूटर्सनीच सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. त्याचप्रकरणात पोलिसांचा कसून तपास सुरू आहे. याचदरम्यान सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी सुखा नावाच्या आरोपीला गुरूवारी हरयाणामधील पानिपत येथून अटक केली होती.
फेब्रुवारी महिन्यात सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊसवर इतरांसह रेकी केल्याच्या आरोपावरून नवी मुंबई पोलिसांनी गुरुवारी हरियाणातील सुखबीर बलबीर सिंग उर्फ सुखा याला अटक केली. तो शस्त्रास्त्र पुरवठादार होता आणि तो शस्त्रे घेण्यासाठी पाकिस्तानस्थित डोगर या व्यक्तीच्या संपर्कात होता. सुखा पानिपतमधील एका हॉटेलमध्ये लपला होता आणि त्याने केस आणि दाढी वाढवून आपला लूक बदलला होता.पनवेलमध्ये झालेल्या रेकी ऑपरेशनमध्ये 16-17 जणांचा सहभाग होता, त्यापैकी 4 जण जूनमध्ये अटक करण्यात आली होती.
आता सलमान खान गोळीबार प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आरोप पत्र दाखल केलं आहे .यामध्ये अनेक महत्वाच्या मुद्यांचा समावेश आहे.
आरोपपत्रात काय म्हटलंय ?
नवी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात असे नमूद करण्यात आले होते की आरोपींना 25 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते आणि पाकिस्तानकडून शस्त्रे आणायची होती. तसेच सलमान हा चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान किंवा त्याचे पनवेल फार्महाऊस सोडत असताना त्याचा खून करण्यासाठी बिश्नोई टोळीने 25 लाख रुपयांचा करार जारी केला होता.
ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत रचण्यात आली होती. या टोळीने पाकिस्तानकडून AK-47, AK-92, M16 रायफल्स आणि तुर्की बनावटीची झिगाना पिस्तूल यासह प्रगत शस्त्रे मिळविण्याची योजना आखली होती. या टोळीने बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई, गोल्डी ब्रार, कश्यप, भाटिया, चीना आणि जावेद खान यांच्यासह 15-16 सदस्यांसह व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे संवाद साधला.सुखा आणि डोगर हे पाकिस्तानचे आहेत, जिथे ते शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारे म्हणून काम करतात, असेही आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.
सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी कोर्टात जे चार्जशीट दाखल केलं होतं, त्यात सलमानच्या जबाबाचाही समावेश होता. सलमाने असंही म्हटलं होतं की जानेवारीमध्ये दोन अनोळखी लोकांनी बनावट ओळखपत्र दाखवून त्याच्या पनवेल फार्महाऊसमध्ये शिरकाव करण्याचाही प्रयत्न केला होता. 2022 मध्ये सलमानच्या वांद्रे इथल्या इमारतीबाहेर धमकीचं पत्र आढळून आलं होतं. तर मार्च 2023 मध्ये ई-मेलद्वारे सलमानला लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.