पुणे : नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच पुण्यामध्ये भर दिवसा कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात त्याला भरदिवसा गोळ्या घालण्यात आल्या. घराजवळच जखमी अवस्थेत पडलेल्या शरद मोहोळला जवळील सह्याद्री रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपाचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शरद मोहोळ याच्या जाण्याने पुण्यातील कोथरूड परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शरद मोहोळच्या खूनानंतर सर्वांना त्याचा चुलत भाऊ संदीप मोहोळ याच्या खूनाची आठवण झाली. तुम्हाला माहिती नसेल, ज्यावेळी संदीप मोहोळला गाडीत गोळ्या घालून मारलं त्यावेळी ती गाडी शरद मोहोळ चालवत होता.
संदीप मोहोळवर गोळ्या मारल्या त्यावेळी शरद मोहोळ चालवत होता गाडी
शरद मोहोळ आधी या टोळीचा मुख्य सुत्रधार संदीप मोहोळ याचीही भरदिवसा गोळ्या घालून हत्या झाली होता. 2007 साली पुण्यातील पौड फाट्याजवळील गणपती मंदिरा समोर गाडीच्या काचा फोडून मारणे टोळीने त्याला गोळ्या घालत ठार केलं होतं. त्यावेळी शरद मोहोळ हा गाडी चालवत होता. शरद मोहोळ याच्याकडे टोळीची सूत्र कशी आलीत आणि संदीपला संपवल्यावर शरद मोहोळ याने नेमकी कोणती शपथ घेतली होती? जाणून घ्या.
संदीप मोहोळ याच्यावर खंडणी, जमीन बळकवणे, खून आणि खूनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे होते. पुण्यातील आयटी पार्क आलं त्यानंतर गुंठामंत्री चर्चेत आले होते. त्यावेळी टोळीयुद्धाला खऱ्या अर्थाने सुरू झाली होती. वर्चस्वाच्या लढाईसाठी आरोपींनी रक्ताची होळी खेळली. संदीप मोहोळ यानेही आपली टोळी तयार केली होती. शरद मोहोळ हा संदीप मोहोळ याचा सख्खा चुलत भाऊ होता. संदीप मोहोळ याला पुण्यात पौड फोडा जवळील सिग्नलवर हातोडीने त्याच्या गाडीच्या काचा फोडत गोळ्या झाडून हत्या केली गेली. त्यावेळी संदीप मोहोळच्या हत्येनंतर शरद मोहोळ याने मारणे टोळीला संपवण्याची शपथ घेतली होती.
दरम्यान, संदीप मोहोळ याला गणेश मारणे टोळीने मारल्यावर गणेश मारणे अटकेत होता. तेव्हा मारणे टोळीची सूत्र किशोर मारणे याच्या हातात गेली होतीत. शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनी याचा बदला म्हणून 2010 साली पुण्यातील निलायम चित्रपटगृहाजवळील एका हॉटेलमध्ये किशोर मारणे याची निर्घृण हत्या केली होती. किशोर मारणेवर त्यावेळी जवळपास कोयत्याने तब्बल 40 वार केले होते. तेव्हापासून हे टोळी युद्ध चालत आलं आहे.