पत्नी नांदायला येत नाही म्हणून तो संतापला, भन्नाट आंदोलन करत दिलेल्या इशाऱ्यांनं पोलिसांची पळापळ, नेमकं काय घडलं?

| Updated on: Apr 24, 2023 | 3:50 PM

पत्नी नांदायला येत नाही म्हणून पीडित पतीने पोलिस ठाण्याच्या समोरच केलेले भन्नाट आंदोलन चर्चेचा विषय ठरत आहे. आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.

पत्नी नांदायला येत नाही म्हणून तो संतापला, भन्नाट आंदोलन करत दिलेल्या इशाऱ्यांनं पोलिसांची पळापळ, नेमकं काय घडलं?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

सांगली : पत्नी नांदायला येत नाही म्हणून अनेक पती कायदेशीर मार्गाचा वापर करत असतात. त्यासाठी पोलिस आणि नातेवाईकांच्या मदतीने प्रयत्न केले जातात. मात्र, हे प्रयत्न करूनही कुठे लक्ष देत नसल्याने एका पीडित पतीने भन्नाट आंदोलन केले आहे. या आंदोलनानंतर पोलिसांसहित सासरच्या मंडळींची पळता भुई थोडी झाली आहे. सांगलीच्या जत शहरामध्ये एका पतीने मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आहे. पत्नी नांदायला येत नाही, पोलीस ही दखल घेत नाही म्हणून थेट पोलीस ठाण्यासमोरच्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

चांदसाब चिवनगी,असे पतीचे नाव असून तो मूळचा कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातल्या इंडी येथील आहे. त्याचं लग्न जत तालुक्यातल्या गिरगाव इथल्या मुलीशी झाला,असून त्यांना चार आपत्य देखील आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पत्नी माहेरी निघून आली आहे.

वारंवार विनंती करून देखील सासरची लोक पत्नीला पाठवत नसल्याने चांदसाब यांनी जत पोलीस ठाण्यामध्ये देखील धाव घेतली होती. मात्र त्या ठिकाणी दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर आज सकाळी थेट जत पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केले आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिस ठाण्यासमोर असलेल्या मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले. सुमारे तासभर चांद साब हा मोबाईल टॉवरवर बसून होता, त्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली, अखेर पोलिसांनी पत्नीला बोलून घेऊन असे आश्वासन दिले.

तडजोड करण्याचा आश्वासन दिल्यानंतर चांदसाब खाली उतरला,आणि सुमारे तासभर सुरू असलेला हा सिनेस्टाईल गोंधळ थांबला. खरंतर या प्रकारानंतर या आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे.