सुपारी देणारी आणि घेणारे दोघेही फसले, सांगली पोलिसांनी पुण्यात येऊन ‘सुपारीबहाद्दरांना’ बेड्या ठोकल्या

आरोपींना ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता एका ओळखीच्या महिलेने पैसे देऊन त्यांना सांगली जिल्ह्यातील तासगाव या ठिकाणी असणाऱ्या एका शोरुम मधील व्यक्तीस मारहाण करून लुटण्यास सांगितलं होतं.

सुपारी देणारी आणि घेणारे दोघेही फसले, सांगली पोलिसांनी पुण्यात येऊन 'सुपारीबहाद्दरांना' बेड्या ठोकल्या
सांगली पोलिस आरोपीसह
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 11:45 AM

सांगली : सुपारी घेऊन लूटमार करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुणे येथून अटक केली आहे. तर सुपारी देणाऱ्या एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी तासगाव रोडवरील कुमठे चौक नजीक एका व्यक्तीला मारहाण करत लुटण्यात आल्याचा प्रकार घडला होता. एका तरुणीने पैसे देऊन सदर व्यक्तीला मारहाण करत लुटण्यासाठी पैसे दिल्याची कबुली,दोघांच्याकडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांच्या चौकशीत गुन्ह्याची कबुली

सांगली ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील तासगाव रोडवरील कुमठे चौकात 20 ऑगस्ट रोजी गाडी अडवून रोहन पाटील (रा. उत्कर्षनगर कुपवाड रोड) या व्यक्तीला लुटण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पुण्यातील दोघा इसमांनी लूटमार केल्याची माहिती मिळाली.

यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुण्यातील गुंजन टॉकीज येथून सोनल रसाळ, (वय 19, रा.रामवाडी झोपडपट्टी, पुणे) आणि बबलू चव्हाण, (वय 20, रा. संजय पार्क, झोपडपट्टी लोहगाव,पुणे) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

आरोपींना ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता एका ओळखीच्या महिलेने पैसे देऊन त्यांना सांगली जिल्ह्यातील तासगाव या ठिकाणी असणाऱ्या एका शोरुम मधील व्यक्तीस मारहाण करून लुटण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आपण सदरच्या इसमास अडवून त्याला मारहाण करत लुटल्याची कबुली दिली.

भिवंडीत थरार, बॉयफ्रेण्डसोबत राहण्यासाठी पतीच्या हत्येची सुपारी

भिवंडीतील ओला कार चालकाची पत्नीनेच प्रियकराच्या साथीने सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. या प्रकरणी आरोपी पत्नी, तिचा प्रियकर यांच्याशिवाय दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पतीची सुपारी द्यायला पैसे जमवण्यासाठी महिलेने मंगळसूत्रही गहाण ठेवल्याची माहिती उघड झाली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर उभ्या असलेल्या एका कारमध्ये मृतदेह आढळल्याने चार दिवसांपूर्वी खळबळ उडाली होती.

आरोपी श्रुती गंजी हिने मंगळसूत्र आणि इतर सोन्याचे दागिने गहाण ठेवून एक लाख रुपये जमवले होते, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. याशिवाय एफडी मोडून आणखी तीन लाख रुपये उभे करण्याचा तिचा इरादा होता. बॉयफ्रेण्डसोबत राहण्यासाठी पती प्रभाकर गंजीपासून श्रुतीला घटस्फोट घ्यायचा होता. मात्र पतीने त्यास विरोध केला होता. खुद्द प्रभाकरचेही अन्य महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला जातो.

पोलिसांनी आरोपी पत्नी श्रुती गंजी, तिचा प्रियकर हितेश वाला, तिची मैत्रीण प्रिया आणि साथीदार संतोष यांना अटक केली आहे. तर अन्य दोघा जणांचा शोध सुरु आहे. चौकशीदरम्यान श्रुतीच्या उत्तरांमध्ये पोलिसांना विसंगती आढळली. त्यामुळे त्यांनी कसून चौकशी केली असता, तिने पतीच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली.

(Sangali Police Arrested Accused In pune)

हे ही वाचा :

आजारपणाला कंटाळून विवाहितेची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

चॉकलेटच्या रॅपरमधून गांजाची तस्करी, आरोपींची ‘टॅलेंटगिरी’ ‘चतूर’ पोलिसांनी उघडी पाडली

27 गुन्हे नावावर असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या अहमदनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.