अगदी थोडक्यात बचावले! सांगलीत चालत्या एसटीवर झाड कोसळलं, पण चालकामुळे सगळे वाचले
Sangli News : सांगलीच्या काँग्रेस कमिटी शेजारुन जात असताना धावत्या एसटीवर झाड कोसळल्याचं लक्षात येताच, एसटी चालकानं कर्रकूच ब्रेक मारला.
सांगली : कल्पना करा तुम्ही एसटीतून प्रवास करताय. बाहेर जोरात वारा सुटलाय. वातावरण आल्हाददायक बनलाय. पण अशातच अचानक एक भलंमोठं झाड तुम्ही प्रवास करत असलेल्या धावत्या एसटीवर (Maharashtra ST Bus) कोसळलं, तर…? नेमका हाच प्रसंग सांगलीतील (Sangli News) काही प्रवाशांना आला. एसटीतून प्रवास करताना एक वृक्ष उन्मळून थेट धावत्या एसटीवरच कोसळला. पण चालकानं देवदुताप्रमाणे कामगिरी बजावली. प्रसंगावनधान राखलं आणि त्यामुळे एसटी प्रवाशांना जीव (Fortunately survived) अगदी थोडक्यात वाचलाय. मोठा अनर्थ अगदी थोडक्यात टळलाय. सांगलीच्या काँग्रेस कमिटी शेजारी असलेल्या रस्त्यावर असलेलं चिंचेच झाडं थेड एसटीवर कोसळल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.
नेमकं कुठे झाड पडलं?
सांगलीच्या काँग्रेस कमिटी शेजारुन जात असताना धावत्या एसटीवर झाड कोसळल्याचं लक्षात येताच, एसटी चालकानं कर्रकूच ब्रेक मारला. झाड एसटीवर पडलं होतं. यानंतर लगेचच चालक आणि वाहकानं एसटीतील प्रवाशांना बाहेर काढलं. सुदैवानं कुणालाही यात जखम झाली नाही. मात्र थोडक्यात मोठी दुर्घटनेतून सर्व प्रवासी बचावले. यावेळी रस्त्याकडेला लागलेल्या एका फोर व्हीलरवर ही झाड कोसळले. यात एसटीसह कारचंही नुकसान झालंय. मात्र थोडक्यात जीवितहानी टळलीय.
दरम्यान, अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी कटरच्या मदतीने झाड कापलं आणि त्यानंतर या मार्गावरची वाहतूक मोकळी झाली. तोपर्यंत वाहतुकीचा मोठा खोळंबा या मार्गावर झाला होता. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाड पडलेल्याच्या ठिकाणी झाली होती.
वाहन चालकांनो काळजी घ्या..
पावसात अनेकवेळा झाडांची पडझड होत असते. तसंच रस्ताही निसरडा झालेला असतो. अशावेळी दुचाकीस्वारांसह सर्वच वाहन चालकांनी अधिक खबरदारी बाळगावी. वाहन वेगानं न चालवता सतर्कता बाळगावी, असं आवाहनही केलं जातं. अन्यथा दुर्घटना होण्याचीही भीती असते. मुसळधार पावसात शक्यतो वाहनं चालवू नयेत किंवा वाहन चालवताना अत्यंत संतुलित आणि नियंत्रित वेगात चालवावीत, असंही आवाहन केलं जातंय.